तेलंगणात बसला अपघात: ४५ ठार, १८ जखमी

ADV
जगतियाल : वृत्तसंस्था 
जगतियाल येथील हनुमान मंदिराला जात असताना तेलंगणा राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या बसला भीषण अपघात झाल्याची माहिती मिळते आहे. या अपघातात  ४५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर १८ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जगतियालमधील कोंडागट्टू घाटात ही दुर्घटना घडली आहे.
[amazon_link asins=’B01BKEZYBY,B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’29b2186a-b5ac-11e8-a910-5b1f111943e9′]तेलंगणा राज्य रस्ते परिवहन वाहतूक महामंडळ (TSRTC) च्या बसला आज सकाळी अपघात झाला. या बसमध्ये ६३ प्रवासी होते. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच जगतियालचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक सिंधू शर्मा यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात ४५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृत्युमुखींची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
[amazon_link asins=’B071D4MP9T,B07417987C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’355315e2-b5ac-11e8-a359-7df7996d79d5′]ही बस कोंडागट्टूच्या हनुमान मंदिरहून जगतियालला जात होती. वळण रस्ता आल्यानंतर ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडला व बस खोल दरीत कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून ५ लाखांची आर्थिक मदतही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.

पोलीसनामा न्युज
ब्रेकिंग न्यूज तसेच राज्यातील आणि देशविदेशातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पोलिसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा… आणि मिळवा पोलीसनामा च्या प्रत्येक बातमीची लिंक