Telegram मध्ये आले कामाचे अनेक मोठे फीचर्स, ‘इथं’ पहा पूर्ण लिस्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या वर्क फ्रॉम होम, व्हर्च्युअल चॅट-बेस्ड कन्व्हर्सेशन्स आणि मीटिंग्सचे वाढते प्रमाण पहाता टेलीग्रामने आपल्या प्लॅटफॉर्मवर काही नवीन फीचर्स अ‍ॅड केले आहेत. यामध्ये मॅसेन्जरमध्ये सर्च फिल्टर, कमेंट्स, इमोजी आणि अ‍ॅडमिनशी संबंधित काही अपडेट्स जारी केले आहेत. या बदलांबाबत जाणून घेवूयात…

सर्च फिल्टर्स
टेलीग्रामच्या सर्च फिल्टर्सच्या मदतीने यूजर्स सहजपणे एखाद्या स्पेसिफिक मॅसेजला सर्च करू शकतात. अ‍ॅपमध्ये चॅट्स, मीडिया, लिंक्स, फाइल्स, म्यूझिक आणि व्हॉइस मॅसेजचे 6 वेगवेगळे टॅब्ज बनवण्यात आले आहेत. याद्वारे टाइम, पर्सन, ग्रुप आणि चॅनलच्या आधारावर मॅसेज वेगवेगळा ठेवला जाईल. याद्वारे यूजर्स या फिल्टर्स द्वारे पोस्टमध्ये सेंड किंवा रिसिव्ह केलेले मॅसेज अ‍ॅक्सेस करू शकतील.

चॅनल कमेंट
लेटेस्ट अपग्रेडनंतर आता यूजर्स एका चॅनल पोस्टवर कमेंट करू शकतात. अगोदर हे केवळ वन-वे होते. मात्र, हे त्याच चॅनल्समध्ये अलाऊ असेल, जे तुम्हाला डिस्कशन गु्रपमधून लिंक्ड असतील. सोबतच कमेंटस व्हॉईस मॅसेज, स्टिकर्स आणि गिफ फाइल्सद्वारे पाठवता येतील. तर, अ‍ॅडमिनला ही पॉवर असेल की, तो ग्रुपची शिस्त राखण्यासाठी कमेंट ब्लॉक करू शकतो.

एनोनिमस अ‍ॅडमिन्स
या फीचरच्या मदतीने एखाद्या ग्रुपच्या अ‍ॅपडमीनला आपली आयडेंटीटी लपवून एनोनिमस राहाण्याचे स्वातंत्र्य मिळेल. तर, अ‍ॅडमिनने पाठवलेला कोणताही मॅसेज ग्रुपच्या नावाने दिसेल. हे फीचर अगोदरच टेलीग्राम चॅनल्ससाठी अ‍ॅप्लीकेबल आहे आणि आता ते ग्रुप्ससाठी उपलब्ध आहे.

अ‍ॅनिमेशन
अँड्रॉइड यूजर्ससाठी नवीन अ‍ॅनिमेशन पॉप-अप्स सादर केले आहे. आता मॅसेज डिलीट करताना मीडिया सेव करताना आणि नोटिफिकेशन्स चेंज करताना इंटरॅक्टिव्ह अ‍ॅनिमेशन्स दिसतील.

प्रोफाइल पिक्चर
या अपडेटच्या दुसर्‍या हायलाईटबाबत बोलायचे तर प्रोफाइल पिक्चर्सला केवळ आता ग्रुप चॅटमध्ये कोणत्याही डिस्प्ले फोटोला प्रेस करून होल्ड केल्यास सहज व्ह्यू करता येईल.