पुण्यातील ‘या’ प्रसिद्ध मंदिराच्या पुजाऱ्याला मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भवानी पेठ येथील बालाजी मंदिराचे पुजारी यांना हाताने व लाकडी पट्टीने डोक्यात, कपाळावर व गालावर मारहाण करुन जखमी करण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी बालाजी ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पुजारी लालदास गुरुदास गुरुराम रामनारायणदास बैरागी (वय २७, रा. बालाजी मंदिर, भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.
पुजारी बैरागी हे गेली काही वर्षे बालाजी मंदिरात काम करीत असून तेथेच राहतात. त्यांनी ट्रस्टचे अध्यक्षांवर केस केली आहे. ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव जाधव यांनी रविवारी दुपारी बाराच्या सुमारास त्यांना बोलावले. व तु बहोत कुद रहा है, तेरे को मै आज देखता हू, तुम बार बार हमारे उपर केस लगाते हो, असे म्हटले. त्यावर बैरागी यांनी मै मेरा काम कर रहा हू, तुम तुम्हारा काम करो असे उत्तर दिले. यावर संतापलेल्या साहेबराव जाधव यांनी बैरागी यांना धमकी देऊन शिवीगाळ करुन हाताने व लाकडी पट्टीने त्यांच्या डोक्यात, कपाळावर व गालावर मारहाण करुन जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. बैरागी यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी ट्रस्ट अध्यक्ष जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.