भारतीय शेअर बाजारात यापुर्वी 10 वेळा माजला होता ‘हाहाकार’, ‘या’ दहा तारखांना सेन्सेक्स सर्वाधिक ‘कोसळला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सोमवार म्हणजेच ९ मार्च २०२० हा दिवस खूप वाईट ठरला. बीएसईचा सेन्सेक्स १,९४१ अंकांच्या सर्वात मोठ्या एका दिवसाच्या घसरणीसह ३५,६३४ वर बंद झाला. या घसरणीचे विविध कारणे म्हणजे जागतिक क्रूड ऑइलच्या किमतीत मोठी घसरण, एस बँक प्रकरण, जगभरातील कोरोना विषाणूचा हाहाकार आणि भारतीय भांडवल बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांकडून पैसे काढले जाणे ही आहेत. सेन्सेक्स वर आलेल्या आतापर्यंतच्या १० सर्वात मोठ्या घसरणी पाहूया…

१) ६ मार्च २०२० ला सेन्सेक्स ८९४ अंकांनी तर २८ फेब्रुवारी २०२० रोजी १,४४८.३७ अंकांनी घसरला.

२) २४ ऑगस्ट २०१५ रोजी सेन्सेक्स मध्ये १,६२४.५१ अंकांची घसरण नोंदवण्यात आली होती. जागतिक शेअर बाजारात घसरण आणि रुपयाची कमजोरी हे प्रमुख कारणं होती. २०१५ मध्येच ६ जानेवारीला सेनेक्स ८५४ अंकांनी खाली आला होता.

३) २१ जानेवारी २००८ रोजी सेन्सेक्समध्ये १,४०८.३५ अंकांची घसरण नोंदली गेली. तसेच हा काळ जागतिक आर्थिक संकटाचा होता आणि जगातील अर्थव्यवस्थेतील सुस्तपणाची चिंता ही या घसरणीमागील कारण बनले. २००८ मध्येच २४ ऑक्टोबर रोजी सेन्सेक्स १,०७०.६३ अंकांनी, १७ मार्च रोजी ९५१.०३ अंकांनी, ३ मार्चला ९००.८४ आणि २२ जानेवारीला ८७५.४१ अंकांनी खाली आला होता.

४) १ फेब्रुवारी २०२० रोजी सेन्सेक्स ९८७.९६ अंकांनी खाली आला होता. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजारावर भारी बिकवाली झाल्याचे दिसून आले.

५) केंद्रीय अर्थसंकल्प २ फेब्रुवारी २०१८ रोजी सादर करण्यात आला आणि समभागांच्या गुंतवणूकीच्या कठोर नियमांमुळे सेन्सेक्समध्ये ८३९.९१ अंकांची घसरण नोंदवण्यात आली होती.

६) ११ फेब्रुवारी २०१६ रोजी सेन्सेक्समध्ये ८०७.०७ अंकांची घसरण झाली.

७) ८ जुलै २०१९ रोजी व्याज दरात वाढ आणि अस्थिरतेमुळे सेन्सेक्समध्ये ७९२.८२ अंकांची घसरण झाली होती.

८) १६ ऑगस्ट २०१३ रोजी सेन्सेक्समध्ये ७६९.४१ अंकांची घसरण नोंदली गेली.

९) २२ सप्टेंबर २०११ रोजी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील सुस्तपणाच्या चिंतेमुळे बीएसईचा सेन्सेक्स ७०४ अंकांनी घसरला होता.

१०) १३ ऑगस्ट २०१९ रोजी जागतिक शेअर बाजारात जोरदार बिकवालीमूळे भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून आली. या दिवशी सेन्सेक्स ६२३.७५ अंकांनी खाली आला होता.