सचिन तेंडुलकरच्या कटआऊटवर काळं तेल टाकल्यानं देवेंद्र फडणवीस संतापले, म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाईन टीम मुंबई: दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानासह अनेकानी पाठींबा दर्शवला. त्यासंदर्भात अनेकांनी ट्विट करत केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यावरून मास्टरब्लास्ट भारतरत्न आणि महाराष्ट्रपुत्र क्रिकेटर सचिन तेंडुलकर यानं ट्विट करत ‘भारतासाठी काय चांगलं आहे, हे येथील नागरिकांना कळतं’, अशा शब्दात आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटिंना फटकारलं. सचिनने केलेल्या ट्विट नंतर नेटिझन्स चांगलेच खवळले असून त्यांनी सचिनला ट्रोल केलं आहे. तर केरळमधील युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी सचिनच्या पोस्टरला काळे तेल वाहून त्याचा निषेध नोंदवला. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचा निषेध नोंदवत राज्यतील महाविकास आघाडी सरकारला प्रश्न विचारला आहे.

सचिन तेंडुलकरने 3 फेब्रुवारीला देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वता याबद्दल ट्विट केलं होत. त्यानंतर, इतरही दिग्गज क्रिकेटर्सं आणि सेलिब्रिटींनी इंडिया टुगेदर म्हणत सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केले. सचिनच्या ट्विटला १ लाख ८ हजार जणांनी रिट्विट केलं, तर ६७ हजार लोकांनी त्यावर कमेंट्स केल्या. यामुळे सचिनविरोधी सोशल मीडियावर वातावरण तयार झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यातच मराठमोळा दिग्दर्शन समीर विध्वंस यांनीही सचिनच्या ट्विटवर नाराजी प्रकट करताना परखड मत मांडले. सचिन विरोधी सर्वानी आक्रमक भूमिका घेतली असतानाच केरळमधील कोची येथे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सचिनच्या लाकडी कटआऊटला काळ्या ऑईलने अंघोळ घालून सचिनच्या ट्विटचा निषेध नोंदवला. याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत भूमिपुत्राचा, महाराष्ट्र भूषण आणि देशाचं भूषण असलेल्या सचिनचा हा अवमान राज्यातील महाविकास आघाडी सहन करणार का? असा प्रश्नही फडणवीस यांनी विचारला आहे.

काय केलं होत सचिन तेंडुलकरनं ट्विट
शेतकरी आंदोलनाबाबद पॉप स्टार रिहाना हिनं ट्विट केल्यानंतर तिला भारतीयांच्या रोषाचा सामना करावा लागला. सर्वप्रथम सचिननं रिहानाच्या ट्विटला रिट्विट करत तिला अप्रत्यक्षपणे सुनावलं होत. भारताच्या सार्वभौत्माविषयी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. देशातील घडामोडींबाबत बाहेरील लोक प्रेक्षक बनू शकतात, पण हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतासाठी काय चांगलं आहे, हे येथील नागरिकांना कळतं आणि ते त्यांनीच ठरवावं. देश हा एकसंध राहिला पाहिजे, एक राष्ट्र म्हणून एकजूटीने राहण्याची गरज आहे, असे ट्विट सचिन तेंडुलकरने केलं होत.

समीर विध्वंस यांची टीका
मराठमोळा दिग्दर्शन समीर विध्वंस यांनीही सचिनच्या ट्विटवर नाराजी प्रकट करताना परखड मत मांडले. ते म्हणाले, सचिनची बॅटींग बघत लहानाचा मोठा झालो! तो माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता! आयुष्यात अनेक निराश क्षणी मी त्याच्या इनिंग्ज बघायचो, खूप बरं वाटायचं. त्याच्या अनेक गोष्टी मनाला पटल्या नाहीत पण हे कधी बदललं नव्हतं. पण आता मात्र इथून पुढे सगळं वेगळं असेल. राग येतोचे पण वाईट जास्त वाटतंय!” असं त्यांनी म्हंटल आहे.