Advt.

Tesla Plant In India | टेस्लाला आकर्षित करण्यासाठी गुंतली अनेक राज्ये ! महाराष्ट्र, पश्‍चिम बंगाल, तेलंगणा आणि पंजाब यांनी प्लांट उभारण्यासाठी दिलं आमंत्रण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Tesla Plant In India | भारतातील चार राज्यांनी इलेक्ट्रिक कार निर्मात्या टेस्लाला (Tesla) आकर्षित करण्यासाठी आपले दरवाजेच उघडले नाहीत तर प्लांट उभारण्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासनही दिले आहे. ही राज्ये महाराष्ट्र (Maharashtra), पश्चिम बंगाल (West Bengal), तेलंगणा (Telangana) आणि पंजाब (Punjab) आहेत. या सर्व राज्यांचे उच्च मंत्री व नेत्यांनी रविवारी इंटरनेट मीडियाद्वारे टेस्ला कंपनीचे संस्थापक आणि CEO इलॉन मस्क (Elon Musk) यांना विनंती केली आहे कि कार कारखाना सुरू करण्यासाठी त्यांची राज्ये निवडा. तीन दिवसांपूर्वी मस्क यांनी भारतात प्लांट उभारण्याची घोषणा केली आहे. (Tesla Plant In India)

 

सर्व प्रथम पश्चिम बंगाल आणि तेलंगणातून टेस्ला सीईओला संदेश पाठवण्यात आला आहे. तेलंगणाचे उद्योग मंत्री के.टी रामाराव (KT Rama Rao) यांनी थेट इलॉन मस्कला संबोधित करत ट्विट केले आहे “इलॉन, मी तेलंगणाचा उद्योग मंत्री (industry minister) आहे आणि टेस्लाच्या भारतात प्लांट (Tesla Plant In India) उभारण्यामध्ये येणारी आव्हाने कमी करून मदत करण्यास आम्हाला आनंद होईल.” यानंतर पश्चिम बंगालचे अल्पसंख्याक आणि मदरसा शिक्षण मंत्री मोहम्मद गुलाम रब्बानी (Mohammad Ghulam Rabbani) यांनी मस्क यांना आपल्या राज्यात आमंत्रित केले आहे. तसेच त्यांच्या ट्विटच्या खाली,राज्य विरोधी नेत्यांनी टाटा मोटर्सला नॅनो प्रकल्पाची आठवण करून दिली, ज्यांना स्थानिक विरोधामुळे पश्चिम बंगाल सोडावे लागत होते.

महाराष्ट्राकडून जयंत पाटील तर पंजाबकडून सिद्धू यांनी दिले निमंत्रण
महाराष्ट्र सरकारमधील मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी लिहिले की त्यांचे राज्य सर्वात प्रगतीशील आहे. तसेच त्यांनी थेट मस्कला महाराष्ट्रात आपला औद्योगिक कारखाना (manufacturing plant) उभारण्यास सांगितले आहे. व त्यांचे सरकार कंपनीला भारतात व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्व प्रकारची मदत करेल असे आवाहन केले आहे. तसेच, रविवारी पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी मस्कच्या तीन दिवस जुन्या ट्विटला उत्तर देताना लिहिले की पंजाब लुधियानामध्ये (Ludhiana) इलेक्ट्रिक वाहनांसाठी एक हब तयार करेल आणि गुंतवणुकीच्या प्रस्तावाला सिंगल विंडो सिस्टम अंतर्गत मंजूर केले जाईल.

 

उत्पादित कारच्या आयातीसाठी मस्कला विशेष सवलत हवी आहे.
केंद्र सरकारने (Central Government) आधीच सांगितले आहे की ही समस्या टेस्ला कडून आहे,
जी कंपनीवर सध्याचा सीमाशुल्क दर कमी करण्यासाठी दबाव आणत आहे.
संपूर्णपणे तयार केलेल्या कार भारतात आणण्यावरील सध्याचा शुल्क दर 110 टक्क्यांवरून 40 टक्क्यांवर आणला पाहिजे.
केंद्राचे म्हणणे आहे की त्यांनी इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी PLI योजना लागू केली आहे, ज्याचा फायदा कंपनी घेऊ शकते.

 

 

Web Title :- Tesla Plant In India | many states gathered to set up tesla plant in their state maharashtra West Bengal Telangana Punjab
 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

janhvi kapoor | जान्हवीच्या ट्रान्सपरंट क्राॅप टाॅपमधून तिची गुलाबी बिकनी झाली फ्लाॅन्ट, तर चाहते म्हणाले…

 

Winter Health Tips | चहाऐवजी ‘या’ 3 प्रकारच्या काढ्यांचे करा सेवन, जो बचाव करेल सर्दी-ताप आणि इतर संसर्गजन्य आजारांपासून

 

Nitesh Rane | नितेश राणेंना मोठा धक्का ! मुंबई हायकोर्टानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला