TET Exam | टीईटी परीक्षेत कोट्यवधींची उलाढाल ! तुकाराम सुपेंच्या घरातून 90 लाखांचा ऐवज जप्त – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे सायबर पोलिसांच्या (Pune Cyber Police) चौकशीत आरोग्य भरती प्रक्रियेत पेपर फुटीनंतर (Health Department Recruitment Fraud Case), म्हाडा परीक्षेचा (MHADA Exam) पेपर फोडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर महाटीईटी परीक्षेबाबत (TET Exam) धक्कादायक माहिती समोर आली आहे. म्हाडा पेपर फुटी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यात तपास करताना टीईटी परीक्षेतील (TET Exam) गैरप्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुरुवारी (दि.18) रात्री गुन्हा (FIR) दाखल करुन तुकाराम सुपे (Tukaram Supe) आणि अभिषेक सावरीकर (Abhishek Savarikar) यांना अटक (Arrest) केली, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत दिली.

 

जानेवारी 2020 च्या परीक्षेत गैरप्रकार

महाटीईटी परीक्षेची (TET Exam) जाहिरात 2019 मध्ये देण्यात आली होती. यानंतर जानेवारी 2020 मध्ये परीक्षा घेण्यात आली. त्या शिक्षक पात्रता परीक्षेत पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा ठपका तुकाराम सुपे यांच्यावर आहे.

 

 

सुपेंच्या घरातून रोकड जप्त

तुकाराम सुपे यांना अटक केल्यानंतर त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. तुकाराम सुपे यांच्या घरातून 88 लाख 49 हजार 980 रोख, 5 ग्रॅम सोन्याचे नाणे, 5 लाख 50 हजार रुपयांची एफडी केल्याची कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. तसेच सुपे यांनी त्यांच्या मित्रांना लाखो रुपये दिल्याची माहिती मिळत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

कोट्यवधींची उलाढाल

म्हाडाच्या परीक्षेसंदर्भात प्रीतीश देशमुख (Pritish Deshmukh) याच्या घरी छापा टाकला असता 2020 च्या टीईटी परीक्षेचे तब्बल 40 ते 50 विद्यार्थ्यांचे ओळखपत्र सापडली होती. यामुळे टीईटी परीक्षेबाबत चौकशी सुरु करण्यात आली. तुकाराम सुपे याने 1 कोटी 70 लाख, प्रीतीश देशमुख याने 1 कोटी 25 लाख तर अभिषेक सावरीकर याने 1 कोटी 25 लाख असे एकूण 4 कोटी 20 लाख रुपये घेतल्याचे चौकशीत कबुल केले आहे. त्यापैकी 90 लाख रुपये सुपे याच्या घरातून जप्त केले आहेत. यामध्ये आणखी आरोपी असल्याची शक्यता वर्तवून ही लिंक खूप मोठी असण्याची शक्यता पुणे पोलिसांनी वर्तवली आहे.

 

विद्यार्थ्यांचे निकाल बदलले

ज्या विद्यार्थ्याकडून पैसे घेतले आहेत. त्या विद्यार्थ्यांना ओएमआर (OMR) रिकामं ठेवण्यास सांगितले जात होते.
त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या ओएमआरमध्ये बरोबर उत्तर नोंदवून त्या विद्यार्थ्यांचे निकाल बदलले जात होते.

 

2021 च्या टीईटी परीक्षेबाबत धक्कादायक माहिती

प्रितीश देशमुख याच्या घरात 2020 च्या टीईटी परीक्षेचे 40 ते 50 विद्यार्थ्यांचे ओळखपत्र (Student ID card) सापडले.
धक्कादायक बाब म्हणजे 2021 च्या टीईटी परीक्षेत यातील अनेक विद्यार्थी पात्र असल्याचे यादीवरुन समोर आले आहे.
तपासात हे अपात्र उमेदवार पात्र करण्यासाठी तुकाराम सुपे यांचा सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याकडून 50 ते 1 लाख रुपये घेतल्याचे तपासात समोर आले आहे.

 

Web Title :- TET Exam | pune police said tukaram supe Abhishek Savarikar and other accused accepted received money in connection in tet exam scam

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा