TET Exam Scam | टीईटी प्रकरणात आणखी एका सबएजंटला अटक तर म्हाडा पेपरफुटी प्रकरणी एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिक्षक पात्रता परीक्षा (TET Exam Scam) 2018 च्या परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) आणखी एकाला अटक केली आहे. टीईटी परीक्षेत परिक्षार्थींना एकत्र करुन त्यांच्याकडून पैसे घेऊन ते मुख्य एजंट संतोष हरकळ (Santosh Harkal) याला देणाऱ्या सब एजंटला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राजेंद्र विनायक सोळुंकी Rajendra Vinayak Solunki (वय 52, रा. अमोदे, ता. नांदगाव, जि. नाशिक) असे या एजंटाचे नाव आहे. (TET Exam Scam)

 

टीईटी परीक्षेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात (TET Exam Scam) पोलिसांनी स्वप्निल पाटील (Swapnil Patil) याला अटक (Arrest) करुन त्याच्याकडे सखोल चौकशी केली. चौकशीमध्ये त्याने राजेंद्र सोळुंकी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पुणे पोलिसांनी (Pune Police) नाशिक (Nashik) येथून सोळुंकी याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशी त्याने 2019-20 च्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये काही परीक्षार्थींची नावे स्वप्निल पाटील याला दिल्याची माहिती दिली. त्याला न्यायालयात हजर केले असता 23 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. (Pune Cyber Crime)

 

पुणे सायबर पोलिसांनी शुक्रवारी (दि.18)  मुकुंदा जगन्नाथ सूर्यवंशी Mukunda Jagannath Suryavanshi (वय-33 रा. अगोदे, ता. नांदगाव जि. नाशिक) याला अटक केली होती. त्याने 2018 च्या टीईटी परीक्षेत परीक्षार्थींना पात्र करण्यसाठी ऑक्टोबर 2018 मध्ये परीक्षार्थींची यादी दिली होती. राजेंद्र आणि सूर्यवंशी हे दोघे एकाच गावचे राहणारे असल्याने त्या दोघांनी मिळून हा गुन्हा केला आहे. सोळुकी हा देखील एजंट म्हणून काम करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

अंकुश हरकळ (Ankush Harkal) व संतोष हरकळ या दोन प्रमुख एजंटांकडे केलेल्या चौकशीत म्हाडा पेपर फुटीबाबत (MHADA Exam) एका एजंटची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी दीपक विक्रम भुसारी Deepak Vikram Bhusari (वय-32 रा. अयोध्यानगर, बुलडाणा) याला अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दीपक भुसारी याला 24 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addi CP Ramnath Pokale),
आर्थिक व सायबर उपायुक्त भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navtake),
सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार पळसुले (ACP Vijaykumar Palsule),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके (Senior Inspector of Police D.S. Hake),
पोलीस निरीक्षक कुमार घाडगे  (Police Inspector Kumar Ghadge)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भालेराव (ओझघ Bhalerao),
कदीर देशमुख, पोलीस उपनिरीक्षक वाघमारे, सागर पडवळ, पोलीस अंमलदार प्रविण राजपूत, सौरभ घाटे,
आदेश चलवादी, दिनेश मरकड, बाबासाहेब कराळे, अनिल पुंडलिक यांनी ही कारवाई केली

 

 

Web Title :- TET Exam Scam | Another sub-agent arrested in TET case and one arrested in MHADA Exam Paper Leake case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nagpur Crime | क्रिप्टो करेंसीच्या नावाखाली अनेकांची कोट्यावधीची फसवणूक, साथिदाराचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला पुण्यातून अटक; 1 कोटीचा मुद्देमाल जप्त

 

Ahmednagar Crime | Army मध्ये नोकरीच्या आमिषाने युवकांना लाखोंचा गंडा, तोतया सैन्य अधिकारी गजाआड

 

Eknath Khadse | ‘मी टरबुज्या म्हणणार नाही पण…’; नाथाभाऊ देवेंद्र फडणवीसांवर बरसले !