Eknath Khadse | ‘मी टरबुज्या म्हणणार नाही पण…’; नाथाभाऊ देवेंद्र फडणवीसांवर बरसले !

पोलीसनामा ऑनलाइम टीम – भाजपमधून (BJP) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणजेच नाथाभाऊ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर बरसताना दिसले. नाथाभाऊंनी (Eknath Khadse) आपली मुख्यमंत्री बनण्याची इच्छा बोलून दाखवली. जळगावमधील नशिराबाद येथे रेशनिंग कार्ड आणि बारा अंकी नंबर वाटण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

 

मी मुख्यमंत्रिपदाचा (CM) दावेदार होतो म्हणून मला डावलण्यात आलं. मुख्यमंत्रिपदाबाबत नेहमी खान्देशावर अन्याय झाला आहे. टरबूज्या नाही म्हणणार पण माझ्या डोक्यावर आणून ठेवला, असं म्हणत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. खडसेंनी आपली मुख्यमंत्रिपदाच्या यादीतून वगळ्याची सल बोलून दाखताना पक्षावरही निशाणा साधला.

 

स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे होऊन गेले आहेत, या 70 वर्षात कोकणात 3 मुख्यमंंत्री झाले, यातील नारायण राणे (Narayan Rane) आणि मनोहर जोशी तर मराठवाड्यातील विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh), अशोक चव्हाण, शिवाजीराव निलंगेकर यांच्यासह चार मुख्यमंत्री झालेत. विदर्भातील 4 मुख्यमंत्री झाले आणि पाचवा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मात्र नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या उत्तर महाराष्ट्राचा (North Maharashtra) अधिकार असताना 70 वर्षात एकदाही संधी देण्यात आली नसल्याचं खडसे म्हणाले.

दरम्यान, चाळीस चाळीस वर्ष आम्ही पक्षात हमाली केली मात्र अधिकार असतानाही मुख्यमंत्रिपदाच्यावेळी यादीतून डावलण्यात आलं.
देवेंद्रसारखे आम्ही अनेकजण घडवल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. खडसेंच्या या टीकेवर फडणवीस काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

Web Title :- Eknath Khadse | i dont want to say watermelon ncp leader eknath khadse on devendra fadnavis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PMC Draft Ward Structure | पुणे मनपाच्या प्रारुप प्रभाग रचनेवरील हरकतींवर 24 आणि 25 फेब्रुवारीला सुनावणी; बालगंधर्व रंगमंदिरात होणारी सुनावणी ‘वेळापत्रका’ नुसारच

 

Pune Crime | पुण्याच्या कात्रज परिसरातील खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला 12 तासात अटक

 

Chitra Wagh | ‘महाराज असते तर कडेलोट केला असता या सरकारचा’; भाजपच्या कार्यक्रमाला गेल्याने शिवसेनेच्या आमदाराची भाऊजयला मारहाण !

 

Maharashtra Police | ‘वसुली’ प्रकरणात 2 ‘बड्या’ पोलिस अधिकार्‍यांना अटक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक फरार; राज्य पोलीस दलात प्रचंड खळबळ

 

Chitra Wagh | ‘महाराज असते तर कडेलोट केला असता या सरकारचा’; भाजपच्या कार्यक्रमाला गेल्याने शिवसेनेच्या आमदाराची भाऊजयला मारहाण !

 

Multibagger Penny Stock | 10 पैशांवरून 590.45 रुपयांवर पोहचला ‘हा’ शेयर, दिला 5 लाख टक्के जबरदस्त रिटर्न, 1 लाख रुपयांचे झाले 59 कोटी