Thackeray Government | महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यासाठी अध्यादेश काढणार – ठाकरे सरकार

दोन पेक्षा कमी नाहीत व चार पेक्षा अधिक नाहीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Thackeray Government | राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदा, नगरपंचायतीमध्ये बहुसदस्यीय प्रभागाची तरतूद पुन्हा लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (cabinet decision maharashtra) घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (chief minister uddhav thackeray) होते. या संदर्भातील अध्यादेश (Thackeray Government) प्रख्यापित करण्यासाठी राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम,
1965 मध्ये सुधारणा करुन, राज्यातील महानगरपालिका (municipal corporation) व नगरपरिषदांमध्ये (nagar parishad) एक सदस्यीय प्रभाग पध्दती लागू करण्यात आली होती.
तथापि, कोवीड-19 दरम्यान निर्माण झालेली आरोग्य विषयक परिस्थिती हाताळताना निदर्शनास
आलेल्या बाबी तसेच लोकप्रतिनिंधींनी निदर्शनास आणलेली वस्तुस्थिती यामुळे नागरी समस्यांचे निराकरण,
जबाबदारी पार पाडणे निर्वाहन हे प्रभागात सामूहिक प्रतिनिधित्वांमुळे (बहुसदस्यीय प्रभाग पध्दती) अधिक उचित (Thackeray Government) पध्दतीने होऊ शकते
या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील संबंधित कलमात सुधारणा करुन
महानगरपालिकांसाठी बहुसदस्यीय प्रभागाची तरतूद पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार, महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रत्येक प्रभागातून शक्य असेल तेथवर तीन पालिका सदस्य,
परंतु, दोन पेक्षा कमी नाहीत व चार पेक्षा अधिक नाहीत इतकी सदस्य संख्या निर्धारित करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली.

Web Titel :- Thackeray Government | Thackeray government to issue ordinance for implementation of multi-member ward system in Municipal Corporations and Municipal Councils

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Former MLA Mohan Joshi | बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा फेरविचार करा – माजी आमदार मोहन जोशी

Pune Police | पुण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक निलंबीत

BJP vs Shivsena | शिवसेनेला धक्का ! पिंपरी-चिंचवड शिवसेना जिल्हाप्रमुखाचा भाजपात प्रवेश