Thane ACB Trap | 16 हजार रुपये लाचेची मागणी करुन मध्यस्था मार्फत 10 हजार रुपये लाच स्वीकारणारा पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – जनरल स्टोअर्स दुकानदाराकडे 16 हजार रुपये लाचेची मागणी करुन मध्यस्था मार्फत 10 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयातील (Mira-Bhayander Police Commissionerate) हवालदाराला (Police Constable) ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Thane ACB Trap) अटक (Arrest) केली आहे. अमितकुमार एकनाथ पाटील Amit Kumar Eknath Patil (वय-38) असे अटक केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ठाणे एसीबीने (Thane ACB Trap) ही कारवाई नवघर येथे बुधवारी (दि.29) केली.

 

याबाबत तक्रारदार यांनी सोमवारी (दि.27) ठाणे एसीबीच्या (Thane ACB Trap) कार्यालयात लेखी तक्रार केली आहे. तक्रारदार यांचे जनरल स्टोअर्स आहे. ते दुकानात तंबाखु व गुटखा विकत होते. मात्र सध्या त्यांनी गुटखा विक्रीचा धंदा बंद केला आहे. तरी देखील पोलीस हवालादर पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे गुटखा व तंबाखू विक्री करण्याकरिता चालू महिन्याचे आठ हजार आणि मागील महिन्याचे आठ हजार असे एकूण 16 हजार रुपये लाचेची मागणी (Demand a Bribe) केली.

 

लाचेच्या मागणी संदर्भात तक्रारदार यांनी एसबीकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी पडताळणी केली. त्यावेळी पोलीस हवालदार पाटील याच्या समक्ष खासगी व्यक्ती संजय यादव (Sanjay Yadav) याने तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली. तसेच पाटील याने दुसरा मध्यस्थी अमित राकेश मिश्रा (Amit Rakesh Mishra) याच्याकडे बोलणी करण्यास तक्रारदार यांना सांगितले.

त्यानंतर संजय यादव आणि अमित मिश्रा यांनी मंगळवारी (दि.28) तडजोडी अंती दहा हजार रुपये लाच मागितली.
लाचेची रक्कम घेऊन तक्रारदार यांना अमित मिश्रा याने तो काम करत अलेल्या गौरवधर्म काटा कार्यालयात बोलवले.
पथकाने त्या ठिकाणी बुधवारी सापळा रचला.
तक्रारदार यांच्याकडून लाचेची 10 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना अमित मिश्रा याला रंगेहाथ पकडण्यात आले.
त्यानंतर पोलीस हवालदार अमितकुमार पाटील याला ताब्यात घेण्यात आले.
आरोपींवर नवघर पोलीस ठाण्यात (Navghar Police Station) गुन्हा दाखल केला आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे (SP Sunil Lokhande),
अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर (Addl SP Anil Gherdikar) यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पथकाने केली.

 

Web Title :- Thane ACB Trap | A policeman who demanded a bribe of 16 thousand rupees and accepted a bribe of 10 thousand rupees through an intermediary is in the net of anti-corruption.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | ससून हॉस्पीटलच्या इमारतीवरून उडी मारून वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या युवतीची आत्महत्या

Shivchatrapati Sports Award | ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’साठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

MP Girish Bapat | 3 टर्म नगरसेवक अन् 5 टर्म आमदार, भाजपसाठी ‘किंगमेकर’ असलेल्या गिरीश बापटांचा राजकीय प्रवास