Pune Crime News | ससून हॉस्पीटलच्या इमारतीवरून उडी मारून वैद्यकीय शिक्षण घेणार्या युवतीची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (BJ Government Medical College Pune) शिकणार्या युवतीने ससून हॉस्पीटलच्या (Sasoon Hospital) इमारतीवरून उडी मारून आत्महत्या (Suicide In Pune) केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली. युवतीने (MBBS Student Suicide) नैराश्यातून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे मात्र तिने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अद्याप समोर आलेले नाही. (Pune Crime News)
आदिती दलभंजन Aditi Dalbhanjan (20, रा. सिंहगड रोड) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये ती पहिल्या वर्षात शिकत होती. बुधवारी (दि. 29) तिची परिक्षा होती. तिला सोडण्यासाठी पालक देखील आले होते. महाविद्यालयात सोडून ते कामाला गेले. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आदितीने ससून हॉस्पीटलच्या जुन्या इमारतीच्या गच्चीवरून उडली मारली.कोसळल्याने ती गंभीर जखमी झाली.
त्यामध्येच तिचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिसांना आदितीचा मोबाईल सापडला असून पोलिसांनी तो तपासासाठी ताब्यात घेतला आहे. बंडगार्डन पोलिस ठाण्याचे (Bundgarden Police Station) वरिष्ठ निरीक्षक संतोष पाटील (Sr PI Santosh Patil), पोलिस निरीक्षक (गुन्हे) अश्विनी सातपुते (PI Ashwini Satpute) यांनी घटनास्थळी भेट दिली. (Pune Crime News)
Web Title :- Pune Crime News | Suicide of a young woman pursuing medical
education by jumping from the building of Sassoon Hospital MBBS Student
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
NCP MP Mohammed Faizal | शरद पवारांना दिलासा, राष्ट्रवादीच्या खासदाराला पुन्हा सदस्यत्व बहाल