Thane ACB Trap | बिल्डरकडून लाच स्वीकारताना उल्हासनगर महापालिकेतील सहाय्यक आयुक्तांसह तीन जण अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – उल्हासनगर महानगरपालिकेच्या (Ulhasnagar Municipal Corporation) हद्दीत सुरु असलेल्या बांधकामावर कारवाई न करण्यासाठी 20 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) सहाय्यक आयुक्त (Assistant Commissioner), मुकादम आणि खासगी वाहन चालकाला (Driver) ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Thane ACB Trap) सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.6) दुपारी पावणे दोनच्या सुमारास करण्यात आली. ठाणे एसीबीच्या (Thane ACB Trap) या कारवाईमुळे पालिकेत खळबळ उडाली आहे.

 

सहायक आयुक्त प्रभाग क्र.1 अजित रत्ना गोवारी Ajit Ratna Gowari (वय-50), मुकादम प्रकाश राजु संकत, खाजगी वाहन चालक प्रदीप निवृत्ती उमाप (वय- 38) अशी लाच घेताना पकडण्यात आलेल्या लाचखोरांची नावे आहेत. याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Thane ACB Trap) 3 मार्च रोजी तक्रार केली होती.

 

तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक (Builder) असून त्यांचे पालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या जागेवर बांधकाम सुरु आहे. या बांधकामावर कारवाई न करण्यसाठी सहाय्यक आयुक्त अजित गोवारी व प्रकाश संकत यांनी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 20 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांनी याबाबत ठाणे एसीबकडे तक्रार केली.

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार सोमवारी सापळा रचण्यात आला. गोवारी यांनी लाचेची रक्कम प्रकाश संकत यांना घेण्यास सांगितले.
त्यानुसर संकत यांनी तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारुन ती वाहन चालक प्रदीप उमाप याच्याकडे दिली.
संकत आणि उमाप यांना लाच घेताना रंगेहाथ पडले. त्यानंतर सहाय्यक आयुक्त अजित गोवारी यांना ताब्यात घेण्यात आले.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे (SP Sunil Lokhande),
अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर (Addl SP Anil Gherdikar)
यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे एसीबीच्या पथकाने केली.

 

Web Title :- Thane ACB Trap | While accepting bribe from the builder, three people including the Assistant Commissioner of Ulhasnagar Municipal Corporation were caught in the anti-corruption net

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune NCP | महागाई विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची होळी (व्हिडिओ)

PMPML Strike | पीएमपीएमएलचा संप त्वरित मिटवा, आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी

Kolhapur Crime News | अनैतिक संबंधाच्या वादातून तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून खून, कोल्हापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना