दहावीचा समाजशास्त्राचा पेपर व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – खरंतर दहावी आणि बारावी हे दोन्ही वर्ष शैक्षणिक दृष्टिकोनातून महत्वाची मानली जातात. सध्या राज्यात दहावी बोर्डाची परीक्षा सुरु आहे. पेपर फुटीची प्रकरणे वारंवार उघडकीस येत आहेत. असे असताना आता आज सकाळी समाजशास्त्र विषयाचा पेपर भिवंडी येथील एका शाळेतून लीक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
व्हॉट्सअ‍ॅपवरून पेपर व्हायरल झाल्यानंतर याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कॉपी, पेपर फुटणे असे प्रकार रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. मात्र असे असताना देखील आज भिवंडीत समाजशास्त्राचा पेपर परीक्षा सुरू होण्याच्या अर्धातास आधी फुटला. व्हॉट्सअ‍ॅपवरून हा पेपर व्हायरल झाला. याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात येत आहे. दरम्यान, याआधी देखील अशीच पेपर फुटीची घटना या भागात घडली होती. मात्र त्यानंतर देखील योग्य ती काळजी न घेतल्याने पुन्हा एकदा पेपर फुटल्याचे सांगण्यात येत आहे. पालकांनी मात्र या घटनेनंतर शिक्षण विभाग आणि बोर्डावर नाराजी व्यक्त केली आहे.