देशातील सर्वात स्वच्छ शहरांची यादी प्रसिध्द, ‘ही’ ५ शहरे स्वच्छ, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत सध्या जगातील सध्या सर्वात मोठा विकसनशील देश आहे. मागील काही काळापासून भारतात स्वच्छता अभियान जोरात सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केल्यानंतर मोठ्या प्रमाणात देशवासीयांनी त्यात सहभागी होत देश स्वच्छ करण्यास मदत केली आहे. यामार्फत प्रत्येक जण आपल्या शहराला स्वच्छ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. भारताच्या गृहमंत्रालयाने भारतातील सर्वात १० अस्वच्छ आणि १० स्वच्छ शहरांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये आम्ही तुम्हाला या सर्वात वरच्या ५ स्वच्छ शहरांशी नावे सांगणार आहोत.

५) म्हैसूर
या यादीत पाचव्या स्थानावर म्हैसूर असून हे शहर आपल्या स्वछतेसाठी संपूर्ण जगात ओळखले जाते. त्यामुळे या यादीत मंत्रालयाकडून या शहराला पाचवे स्थान देण्यात आले आहे.

४) सूरत
या यादीत हे शहर चौथ्या क्रमांकावर असून भारतातील आणि गुजरातमधील हे अतिशय स्वच्छ आणि सुंदर शहर आहे. त्यामुळे या शहराला या यादीत चौथे स्थान देण्यात आले आहे.

३) विशाखापट्टनम
या यादीत तिसऱ्या स्थानी आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टनम हे शहर असून समुद्रकिनारी असणारे हे शहर आपल्या निसर्गसौंदर्यासाठी आणि स्वच्छतेसाठी ओळखले जाते.

२) भोपाळ
मध्यप्रदेशची राजधानी असलेल्या शहराचा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर समावेश करण्यात आला असून भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून याला पुरस्कार मिळाला आहे.

१) इंदोर
मध्यप्रदेशातीलच दुसरे शहर असलेले इंदोर हे भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखले गेले आहे. सर्वात स्वच्छ शहर म्हणून याचा गौरव करण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –