पुणे : पुणे पोलीसनामा ऑनलाईन – कन्झ्यूमर फोरमधून बोलत असल्याची बतावणी करून बँक खाते व डेबीट कार्डची माहिती घेत खात्यातून ८० हजार रुपये काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकऱणी एका ५७ वर्षीय व्यक्तीने फरासखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार एक महिला व पुरुषावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांच्या मुलीने क्लब फॅक्टरी अॅपवरून ऑनलाइन खरेदी केली होती. त्याच्या रिफंडसाठी कंज्युमर फोरम बोर्डकडे तक्रार केली. या तक्रारीचा गैरफायदा घेत दोघांनी तिला फोन करून करून कंज्युमर फोरम बोर्डमधून बोलत असल्याचे सांगितले. तिचा विश्वास संपादन करून त्यांच्या डेबीट कार्डची माहिती घेत ३ नोव्हेंबर २०१८ रोजी ८० हजार १८१ रुपये ऑनलाइन काढून घेतले. पुढील तपास पोलीस निरीक्षक ( गुन्हे) संभाजी शिर्के करत आहेत. फसवणुकीच्या दुस-या प्रकरणात कोंढवा येथे राहणा-या एका ४२ वर्षीय व्यक्ती