दिल्ली : वृत्तसंस्था – माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजकीय कारकीर्दीवर आधारित ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी प्रदर्शित झाला. मात्र, या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या दृश्यांवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट आम्हाला दाखवा अन्यथा मध्यप्रदेशात तो प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा मध्यप्रदेशातील काँग्रेस नेते सय्यद जफर यांनी दिला आहे. मात्र मुख्यमंत्री कमलनाथ यांनी चित्रपटावर बंदी आणण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचं म्हटलं आहे. यामुळे मध्य प्रदेशात काँग्रेसमध्ये आपापसात समन्वय नसल्याची चर्चा सुरु आहे.
मध्य प्रदेशात नुकतंच काँग्रेसचं सरकार आलं असून कमलनाथ मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. मध्य प्रदेशात चित्रपटावर बंदी आणण्यात आल्याची चर्चा सुरु होती. मात्र जनसंपर्क मंत्रालयाने ट्विट करत सरकारने असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं सांगितलं आहे. बंदी घातल्याचं वृत्त चुकीचं असल्याचं सांगत फेटाळण्यात आलं आहे.
काही प्रसारमाध्यमांनी मध्य प्रदेशात चित्रपटावर बंदी घालण्यात आल्याचं वृत्त दिलं होतं. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच वाद निर्माण झाला असून काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.
काँग्रेस नेते सय्यद जफर यांचा विरोध –