MLA Ravindra Dhangekar | ललित पाटील ड्रग्स केस : …तर पोलीस आयुक्तांच्या घराबाहेर आंदोलन करणार, आमदार रविंद्र धंगेकरांचा इशारा

ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर आणि ललित पाटील मिळून ड्रग्स विकायचे, धंगेकरांचा गंभीर आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील ड्रग्स प्रकरणातील (Pune Drug Case) धागेदोरे दिवसेंदिवस उलगडत चालले आहेत. ड्रग्स माफिया ललित पाटील (Drug Mafia Lalti Patil) याला अटक केल्यानंतर याप्रकरणातील तपासाला गती आली आहे. याच दरम्यान ससून हॉस्पिलच्या बाबतीत शासनाकडून चौकशी समिती स्थापन करण्यात आली. या समितिने अहवाल देऊन पंधरा दिवस झाले तरी अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. याबाबत सातत्याने ललित पाटील प्रकरणात आवाज उठवणारे काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) हे आक्रमक झाले आहेत. जर याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही तर पोलीस आयुक्तांच्या घराबाहेर आंदोलन करणार असल्याचा इशारा धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी दिला आहे. तसेच वेळप्रसंगी न्यायालयात जाऊ असेही त्यांनी सांगितले.

रविंद्र धंगेकर यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ललित पाटील पलायन प्रकरणात अद्याप तपासाला गती मिळाली नसल्याचे सांगितले. तसेच दोन दिवसांपूर्वीच मी पोलीस आयुक्त कार्य़ालयात गेलो होतो आणि तिथं देखील याबाबत पोलिसांशी चर्चा केली. शासन जो अहवाल देईल तो देईल. परंतु नऊ महिने ससून रुग्णालयात पाटील असताना त्याने पोलीस, डॉक्टर तसेच हॉस्पिटल प्रशासन यांना पाटीलने जे पैसे दिले होते, त्यांची चौकशी करावी. मात्र, पोलीस प्रशासन सरकारच्या दबावाखाली असून कोणताही तपास ससूनच्या बाबतीत करत नसल्याचा आरोप धंगेकर यांनी केला.

आरोग्य विभागाकडून जी चौकशी समिती नेमण्यात आली होती त्याचा अहवाल देण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. याचाच अर्थ असा की, शासन तसेच नेमण्यात आलेली समिती ही ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर (Dean Dr. Sanjeev Thakur) यांना अभय देत असल्याची टीका धंगेकर यांनी केली. (MLA Ravindra Dhangekar)

ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर आणि ललित पाटील यांनी मिळून ड्रग्स विकले आहे. हे मी सातत्याने बोलत आहे. तसेच ससूनच्या कॅन्टीन मधून हे सगळे व्यवहार सुरु होते. याबाबत पोलिसांना माहिती असूनही कोणतीही कारवाई होत नाही. याबाबत आत्ता पोलिसांनी डीन संजीव ठाकूर यांना अटक करावी अशी मागणी रविंद्र धंगेकर यांनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Firing News | धक्कादायक! पुण्यात सराफा व्यवसायिकावर गोळीबार करुन दागिन्यांची बॅग पळवली, हल्लेखोरांनी झाडल्या 6 गोळ्या

Pune Crime News | ट्रेडिंगमधून मोठा परतावा देण्याच्या आमिषाने पुण्यातील तरुणीची फसवणूक

Pune PMC News | महापालिका प्रशासनाच्या अनियोजीत कामांचा भुर्दंड ‘लाखांमध्ये’

Crime News | कंपनीत पैसे गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांची कोट्यवधीची फसवणूक, पुण्यातील प्रकार

NCP Hearing Today in Supreme Court | राष्ट्रवादी पक्ष कुणाचा?; निवडणूक आयोगासमोर आज दुपारी सुनावणी, शरद पवार उपस्थित राहणार

Pune Crime News | बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन घेण्याचा प्रयत्न, पुणे धर्मादाय आयुक्त कार्य़ालयातील 2 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल