परभणी मनसे शहर अध्यक्षाला लाच मागितल्याप्रकरणी अटक

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – परभणी मनसे शहर अध्यक्ष सचिन पाटील यांना औरंगाबाद लोहमार्ग पोलिसांनी रेल्वेतील पॅन्ट्री चालकाकडे लाच मागितल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. दरम्यान त्याच प्रकरणी एक आरोपी पसार झाला आहे.

रेल्वेने नेमून दिलेल्या दरांपेक्षा जास्त दराने खाद्य पदार्थांची विक्री तपोवन एक्स्प्रेसमध्ये केली जात असल्याची माहिती परभणी मनसे पदाधिकाऱ्यांना मिळाली असता, त्याबाबत मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी याबाबत आंदोलन केले होते. तर मनसे पदाधिकाऱ्यांनी अनेक तक्रारीही दाखल केल्या होत्या. दरम्यान  रेल्वेतील पॅन्ट्री चालकाकडे परभणी मनसे शहराध्यक्ष सचिन पाटील याने एक ते दोन लाखांची लाच मागितली होती.

दरम्यान तपोवनमधील पॅन्ट्रीकार सुपरवायझर अशोक चतुर राठोड यांनी यासर्व  प्रकारांबाबत लोहमार्ग पोलिसांत तक्रार दिली होती. त्यावेळी फोनवरुन खंडणी मागितल्याप्रकरणी सचिन पाटील आणि उत्तम चव्हाण या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. इतकेच नव्हे तर रेल्वेचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस एस दहातोंडे यांनी सचिन पाटीलला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

विशेष म्हणजे सचिन पाटीलला अटक करण्यात आली असून उत्तम चव्हाण हा पसार झाला आहे. अधिक तपस लोहमार्ग पोलिस करीत आहेत.