TB चं ‘हे’ औषध ठरतंय ‘कोरोना’साठी ‘प्रभावी’, संशोधनांमध्ये आले आढळून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   जगातील अनेक देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. यावर अद्याप कोणतेही औषध तयार झालेले नाही. तरीही जगातले अनेक देश तसेच औषध निर्मात्या कंपन्या त्यावर संशोधन करत आहेत. काही औषधांच्या मानवी चाचण्या देखील सुरू झाल्या आहेत. त्यात भारत देशातील दोन कंपन्याही आघाडीवर आहेत. कोरोनावर रामबाण औषध सापडलेले नसलं तरी काही औषधं प्रभावी ठरत आहेत. TB वर वापरले जाणारे Bacillus Calmette Guerin (BCG) हे औषध प्रभावी ठरत आहे, असे काही संशोधनांमध्ये आढळून आले आहे.

भारतात TBच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. सततच्या प्रभावी उपाययोजना करून आता देशात त्यावर नियंत्रण मिळवले आहे. भारतात BCG ची लस देखील लहानपणी दिली जाते. प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे, असेही सिद्ध झाले आहे. त्यामुळे या संशोधनाचा भारतातही कोरोनाविरुद्धच्या उपाचार करण्यासाठी फायदा होण्याची शक्यता वर्तविली आहे. CNN ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

जगातल्या अनेक देशांमध्ये BCG चा वापर करण्यात येतो. गेल्या 100 वर्षांपासून हे औषध वापरले जाते. त्यामुळे या औषधांच्या परिणामांविषयी विस्तृत माहिती उपलब्ध आहे. कोरोनाबाधित काही रुग्णांना ही लस दिल्यास त्याचा चांगला परिणाम युरोपसह काही देशांमध्ये आढळून आला आहे. त्यामुळे आता जागतिक आरोग्य संघटनेनेही यावर अधिक संशोधन करून शिफारस केली पाहिजे, असे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

हाँगकाँगमधून आपला जीव वाचवून अमेरिकेला पोहोचलेल्या एका वैज्ञानिकाने उघडकीस आणले कि, चीनने कोरोनाविषयी जगाला सांगण्यापूर्वीच त्यांना माहित होते. हाँगकाँग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील व्हायरोलॉजी आणि इम्यूनोलॉजी तज्ज्ञ ली मेंग यान शुक्रवारी ‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे .

ते म्हणाले, साथीच्या सुरूवातीस या क्षेत्रातील अव्वल तज्ज्ञांनीही याकडे दुर्लक्ष केले, अन्यथा लोकांचे प्राण वाचू शकले असते.

यान म्हणते, कोविड -19 चा अभ्यास करणार्‍या जगातील पहिल्या काही वैज्ञानिकांपैकी ती एक आहे. चीन सरकारने परदेशी आणि अगदी हाँगकाँग तज्ज्ञांना संशोधनात सामील होण्यास नकार दिला आहे.