नालासोपारा स्फोटक प्रकरणातील आरोपीकडून मोठा शस्त्रसाठा जप्त

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईन

नालासोपाऱ्यात जप्त केलेल्या बॉम्ब आणि स्फोटकांप्रकरणी काल तिघांना अटक केल्यानंतर राज्य दहशतवादविरोधी पथकानं आज राज्यभरातील विविध भागांतून १३ ते १४ संशयितांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी सुरु असून ताब्यात घेतलेल्या एका आरोपीकडून दडवून ठेवलेला मोठ्ठा हत्यारांचा साठा एटीएसच्या पथकाने जप्त केली आहेत.  यामध्ये १० पिस्टलचा समावेश आहे.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8ca62cdd-9d82-11e8-ab2a-0d61e159bdf8′]

नालासोपारा येथे दहशतवादविरोधी पथकानं (एटीएस) केलेल्या कारवाईत गावठी बॉम्बसह स्फोटकं जप्त केली होती. त्यानंतर नालासोपारा आणि पुण्यातून तिघांना अटक केली होती. त्यानंतर आज एटीएसनं राज्यभरात विविध ठिकाणी कारवाई केली. अटकेत असलेल्या तिघांकडून मिळालेल्या माहितीवरून आणि त्यांच्याशी संपर्कात असलेल्या १३ ते १४ जणांना मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध भागांतून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

आज नव्याने करण्यात आलेल्या तपासामध्ये एका आरोपीने दडवून ठेवलेली हत्यारे व इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या हत्यारांमध्ये १० गावठी पिस्टल मॅगझीनसह, १ गावठी कट्टा, १ एअर गन, १० पिस्टल बॅरल, ६ अर्धवट तयार पिस्टल बॉडी, ६ पिस्टल मॅग्झीन, ३ अर्धवट तयार मॅग्झीन, १६ रिले स्विच, ६ वाहनांच्या नंबर प्लेट्स, १ ट्रिगर मॅकॅनिझम, १ चॉपर, १ स्टील चाकू असा शस्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9403b3c8-9d82-11e8-bb89-f5a8484dc1c9′]

तसेच इतर अर्धवट बनवलेले शस्त्राचे सुटे भाग, टॉर्च, बॅटरी, हॅण्ड ग्लोव्हज, इलेक्ट्रॉनीक वस्तू, पुस्तके, स्फोटकांबाबत हॅण्डबुक, एक्प्लोसीव्ह व मोबाईल प्रिंटआऊट, रिले स्विच सर्किट ड्रॉईंग पेनड्राईव्ह, हार्डडीक्स, मेमरी कार्ड जप्त करण्यात आलेले आहे. आजच्या तपास जप्त केलेल्या जप्तीनुसार आरोपींच्या कलमात वाढ करण्यात आली असून पुढील तपास एटीएसचे पथक करीत आहेत.