Coronavirus : जगासाठी सर्वात मोठा दिलासा ! मिळालं ‘कोरोना’ व्हायरसवरील औषध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे जगभरात कहर माजला आहे. अमेरिकेतील वृत्तपत्रांच्या वृत्तानुसार कोरोनावर लस मिळाली आहे. वृत्तानुसार चीनमधील मेडिकल अथॉरिटीनुसार जपानच्या नव्या टाइप इंफ्लुएंजा ट्रिट करण्यासाठीची लस व्हायरस विरोधात लढण्यास सक्षम आहे. या औषधाचे नाव फेविपिरावीर आहे. याला एविगन नावाने देखील ओळखले जाते.

चीनच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांचे अधिकारी सांग शीनमिन यांच्या मते वुहान आणि शेनजेनमध्ये या औषधाची 340 लोकांवर क्लिनिकल ट्रायल केली गेली आहे. ही आतापर्यंतचे सर्वात जास्त इफेक्ट करणारे औषध आहे. यात पॉझिटिव्ह रुग्णांना 4 दिवसात नेगेटिव्ह आले. लोकांची फुफ्फुस 91 टक्के ठीक झाले, तर बाकी औषधात हा परिणाम 62 टक्के मिळाला.

जपानमध्ये डॉक्टर या औषधाचा वापर करत आहेत. जपानचे डॉक्टर मानतात की सुरुवातीची हलकी- फुलकी लक्षणं या औषधाने ठीक होतात. गंभीर स्थितीत हे औषध काम करत नाही. जयपूरमध्ये नुकतेच कोरोनाग्रस्तांवर एचआयव्ही ठीक करणाऱ्या औषधांचा वापर केला ज्याचा परिणाम पॉझिटिव्ह होता.