बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी स्मारकाचा श्रीगणेशा 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारीला जयंती आहे. त्यामुळे त्याचदिवशी बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीला महापौर बंगल्याची जागा हस्तांतरित करण्यात येणार आहे. यावरून शिवसैनिकांचे दिवंगत शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारीला जयंती आहे. त्यामुळे त्याचदिवशी महापौर बंगल्याच्या जागेचा ताबा बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीला देण्यात येणार आहे. दरम्यान शिवसेनाप्रमुखांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी हजारो शिवसैनिक शिवतीर्थावर येत असतात. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबातील इतर सदस्य तसेच शिवसेनेच्या प्रमुख्य नेत्यांच्या उपस्थितीत शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचा जागेचे श्रीगणेशा होणार आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे महापौर बंगल्यात अंडरग्राऊंड स्मारक बांधले जाणार आहे. दरम्यान महापौर बंगल्याची २३०० स्क्वेअर फुटाची जागा बाळासाहेबांच्या स्मारकासाठी कमी पडली असती. म्हणून बंगल्याच्या मागच्या आणि पुढच्या जागेचाही स्मारकासाठी वापर केला जाणार आहे. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे स्वप्न लवकरच साकार होणार असल्याने शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.