मुलगा म्हणाला माझ्याकडे बंगला आहे, मुलीनं केलं लग्न, जेव्हा घरी पोहचली त्यावेळी झालं ‘असं’ काही

वाराणसी : वृत्त संस्था – प्रेमात अंधळी झालेल्या एका मुलीची अजब प्रेमकथा समोर आली आहे. तिने अगोदर नोकरावर प्रेम केले आणि लग्नकरून संसार मांडण्याचे स्वप्न पाहिले. परंतु हे स्वप्न काही क्षणात उध्वस्त झाले आणि प्रियकराला सोडून ती आपल्या आई-वडिलांकडे परतली.

वाराणसीच्या चोलापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील तरूण येथील फतेहपुरमध्ये एका व्यक्तीकडे शिलाईचे काम करत होता. तरूण जेथे काम करता होता, त्या मालकाच्या मुलीवर त्याचे प्रेम जडले. प्रेम खुप पुढे गेले आणि तरूण आल्या प्रेयसीला घेऊन एक दिवस बनारसमध्ये आला आणि चंदवकमध्ये एका मंदिरात दोघांनी लग्न केले. इकडे आई-वडिल आपल्या मुलीचा शोध घेत होते.

काही दिवसानंतर मुलीने आपल्या आई-वडिलांशी मोबाइलवरून संपर्क साधला. परंतु, मुलीने आपल्या आई-वडिलांना घरी येण्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. त्यानंतर तिचे आई-वडिल शुक्रवारी अजगरा पोलीस चौकीत गेले, तेव्हा तेथे त्या तरूण आणि तरूणीला सुद्धा बोलावण्यात आले. तरूणी जेव्हा पोलीस चौकीत पोहचली, तेव्हा ती आई-वडिलांना पाहून रडू लागली आणि पोलिसांना तिने सांगितले की, प्रियकराने आपल्या जातीबद्दल सांगितले आणि मोबाईमध्ये एका बंगल्याचा फोटो दाखवून हा माझा बंगला असल्याचे सांगितले होते.

यामुळे तरूणी त्याच्याकडे गेली, जेव्हा ती त्याच्या घरी पोहचली तेव्हा बंगला नव्हता, तर तो एका झोपडीत राहात होता. तरूणी म्हणाली, तो आमच्या जातीचाही नाही, इतर कुठल्यातरी जातीचा आहे. यानंतर तिचा लग्न करण्याचा विचार बदलला. याची माहिती तिने आपल्या आई-वडिलांना दिली. यावेळी तरूणाने सांगितले की, आम्ही मंदिरात लग्न केले असून मुलगी प्रौढ आहे.

या दरम्यान प्रेयसीने सांगितले की, हे सर्व खोटं आहे, मी लग्न केलेले नाही. एवढे बोलून मुलगी उठली आणि चौकीजवळच्या हँडपंपवर जाऊन तिने भांगातील कुंकू धुवून टाकले, बांगड्या फोडल्या आणि साडी काढून ड्रेस परिधान करून ती आपल्या आई-वडिलांसमोर आली. यानंतर पोलिसांनी म्हटले की, ती तरूणाला आपला पती मानण्यास तयार नाही. यानंतर पंचायतीमध्ये मोठी चर्चा झाली.

पंचायतीनंतर मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत फतेहपुरला गेली. इकडे पोलिसांनी तरूणाला ताब्यात घेतले, परंतु पंचायतीने सांगितल्यानंतर पोलिसांनी त्यालाही त्याच्या घरी पाठवले.