‘या’ 3 कारणांमुळं झालं होतं ‘सुशांत-अंकिता’चं Breakup !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याच्या निधानानंतर अनेकांनी प्रतिक्रिया देत दु:ख व्यक्त केलं आहे. एक वेळ अशी होती जेव्हा अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि सुशांत रिलेशनशिपमध्ये होते. परंतु नंतर ते दोघे वेगळे झाले. त्यांच्या ब्रेकअपबद्द आज आपण जाणून घेणार आहोत.

2009 साली आलेल्या पवित्र रिश्ता मालिकेच्या सेटवर अंकिता सुशांत यांची ओळख झाली आणि पुढं याचं रुपांतर प्रेमात झालं. यानंतर ते अनेकदा एकत्र दिसू लागले. नंतर सुशांतनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. यानंतर हळूहळू नात्यात कटुता येण्यास सुरुवात झाली. त्यांच्या ब्रेकअपची काही कारणं जाणून घेऊयात.

1) करिअर ग्राफमधील वाढती दरी – सुशांतनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यानंतर त्याला अनेक सिनेमे मिळू लागले. नाव, पैसा प्रसिद्धी सारं काही आलं. दुसरीकडे अंकिताची पवित्र रिश्ता मालिका काही दिवसांनी बंद झाली. सुशांतला नात्याला वेळ देणं जास्त जमत नव्हतं. असं सारं असल्यानं त्यांच्यात खटके उडू लागले. याचा परिणाम असा झाला की, त्यांचं ब्रेकअप झालं.

2) परिणिती चोपडा – सुशांत आणि अंकिता यांच्यात परिणितीमुळंही अनेकदा वाद झाले होते. सुशांत आणि परिणिती यांची वाढती जवळीकता तिला आवडत नव्हती. यावरून दोघांमध्ये अनेकदा खटके उडाले आहे. हेही त्यांच्या ब्रेकअपचं एक कारण आहे.

3) ओव्हर पजेसिव्ह अंकिता – अंकिता सुशांतबद्दल जरा ओव्हर पजेसिव्ह होती. त्यानं जास्त कोणाशी बोलू नये असं तिला वाटत असे. ती त्याच्यावर अनेक बंधनं घालत असे. ती दारूच्या अधीन असल्यानं त्याच्यावरच संशय घ्यायची. कृती सेनन सोबत जवळीक वाढलेलीदेखील तिला आवडलं नव्हतं असंही बोललं जात आहे.