धारवाडमध्ये इमारत कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

बंगळूरु : वृत्तसंस्था – कर्नाटकामधील धारवाड येथे एक तीन मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीचे बांधकाम सुरु होते. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती आहे.  अचानक ही इमारत कोसळल्यामुळे या परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला. याबाबतचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.  ही घटना घडल्यानंतर या ठिकाणी बचाव पथक पोहचले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्याना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

दरम्यान ही घटना नेमकी कशामुळे घडली ? याबाबत अद्याप माहिती उपलब्ध झाली नाही. याठिकाणी स्थानिकांची मोठी गर्दी झाली आहे. बचाव पथक आणि स्थानिक ढिगाऱ्याखाली अडकलेल्याना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.