पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून दोघांचा मृत्यू 

बेळगाव: पोलीसनामा ऑनलाईन 
पुणे – बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील बडेकोळमठ येथे बस उलटून  दोन जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बस बेळगावहून हुबळीच्या दिशेने  निघाली होती.

उतारावरून जात असताना बसमध्ये तांत्रिक बिघाड झाली. बसचे ब्रेक लागत नव्हते. त्यामुळे ड्रायव्हरने बस बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी रस्त्यामधे असलेल्या दुभाजकाला आदळून ही बस उलटली. यात दोन जण जागीच ठार झाले.
[amazon_link asins=’B0784CMFCP’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a8f951fc-8738-11e8-b500-0d291a8add77′]

या अपघातात बसचालक अशोक धुंडी ( वय ५०) आणि एक वृद्ध प्रवासी यांचा समावेश होता. तसेच बस मध्ये असलेल्या प्रवाश्यांपैकी चार जण गंभीर जखमी झाले,  अपघाताचं वृत्त कळताच हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. गंभीर जखमी रुग्णांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. आणि थोड्याच वेळात येथील वाहतूक सुरळीत करण्यात आली.