राज्यातील ‘या’ मोठ्या प्रकल्पाला मान्यता ! नाशिक-पुणे-अहमदनगर शहराच्या विकासाला ‘सुपरफास्ट’ चालना

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक पुणे Nashik Pune सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग या प्रकल्पाच्या प्रस्तावास आता केंद्राकडून मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील या मोठ्या प्रकल्पाला केंद्राकडून समंती मिळाल्याने नाशिक-पुणे-अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे. या हायस्पीड रेल्वेमार्गाचे काम लवकरच आणि गतीने सुरु केले जाणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. त्यावेळी ते नाशिक येथे भुसंपादना बाबत आढावा बैठकीदरम्यान बोलत होते.

नाशिक पुणे Nashik Pune सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग या प्रकल्पासाठी १६ हजार ३९ कोटी रुपये खर्च लागणार आहे. तर २३५ किलोमीटर ग्रीन फील्ड सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वेमुळे जवजवळ पावणे दोन तासामध्ये हा प्रवास होणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निधीतून हा प्रकल्प उभा केला आहे. तर याचे काम महाराष्ट्र रेल पायाभूत सुविधा विकास महामंडळा मार्फत केले जाणार आहे. तसेच, या तिन्ही जिल्ह्यांबरोबर इगतपुरी ते मनमाड सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग सुरु करण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे. असे त्यावेळी मंत्री भुजबळ यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ ?
– नाशिक- पुणे – अहमदनगर हा महाराष्ट्रातील औद्योगिक आणि कृषी विकासाचा संपन्न पट्टा आहे. या रेल्वेमार्गामुळे दोन्ही शहरातील दळणवळण वाढून त्याला अधिक गती येणार आहे.

– प्रस्तावित सेमी हायस्पीड रेल्वेमुळे या तिन्ही जिल्ह्यातील चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळे फाटा, संगमनेर आणि सिन्नर या भागातील महत्वाचे उद्योग, कृषी केंद्र रेल्वेमार्गामुळे जोडले जाणार आहे.

– भूसंपादनासह हा प्रकल्प साडेतीन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा असून, प्रतितास २०० किलोमीटर वेगाने रेल्वे धावणार आहे.

– पार्सल व्हॅनची सुविधा असलेला हा रेल्वेमार्ग नाशिकला ओझर आणि पुणे विमानतळाशी जोडलेला असल्यामुळे कार्गो वाहतूकीशी जोडला जाणार आहे.

– नाशिक रोड, शिंदे, मोहदरी, सिन्नर, दोडी, पलसखेडे, सोनेवाडी, संगमनेर, अंभीरे, साकूर, जांबूत, बोटा, आळे फाटा, भोरवाडी, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण, वाघोली, केलवडी, मांजरी, हडपसर, पुणे अशा १४ स्थानकाचा समावेश आहे.

– कृषी उत्पादनाची वाहतूक सुलभ होणार आहे. त्याचबरोबर हा प्रकल्प पुर्ण करण्यासाठी समृध्दी महामार्गाच्या धरर्तीवर थेट वाटाघाटीतून जमीन संपादन केली जाणार आहे.

– तिन्ही जिल्ह्यातून १०१ गावांमध्ये १३०० हेक्टर भूसंपादन केले जाणार असून, ज्या शेतकऱ्यांची जमीन या प्रकल्पासाठी संपादीत केली जाणार आहे. अशा शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार योग्य मोबदला देण्यात येणार आहे.

READ ALSO THIS :

खुशखबर ! 18 ते 40 वर्षे वयोगटातील 10 वी पास उमेदवारांना पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात नोकरीची सुवर्णसंधी, मुलाखतीविना 2428 पदांसाठी भरती; जाणून घ्या प्रक्रिया

 

लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या

2013 च्या पोलीस उपनिरीक्षक अहर्ता परिक्षेतील 619 अंमलदारांना PSI पदी बढती

 

सकाळी उठल्यानंतर दररोज बडीशेपचे पाणी प्या, नक्की वजन होईल कमी; जाणून घ्या पाणी पिण्याची पध्दत

 

दिलासादायक ! दिवसभरात देशात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा दुप्पट रुग्ण कोरोनामुक्त