संतापजनक ! ‘त्या’ १२ मुलांची काढली अर्धनग्न ‘धिंड’ 

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातल्या तुमसरमध्ये अल्पवयीन मुलांची अर्धनग्न करून धिंड काढण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. तुमसरच्या मॅगनिज इंडिया लिमिटेड कंपनीच्या खदानीत चोरी केल्याचा आरोप सुरक्षा रक्षकाने केला. मात्र या मुलांना पोलिसांच्या स्वाधीन करण्याऐवजी या १२ मुलांना अर्धनग्न करून धिंड काढण्याची अमानुष शिक्षा दिली.

यावर कळस म्हणजे या मुलांची अर्धनग्न धिंड काढताना त्याचा चित्रिकरणही करण्यात आले. या व्हिडिओ समाज माध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे.

१६ ते २२ वयोगटातली ही १२ मुले खदान परिसरात गेलेली होती. या मुलांना सुरक्षा रक्षकाने पकडून त्यांच्यावर चोरीचा आळ घेतला. त्यानंतर त्यांना अर्धनग्न करत त्यांची धिंड काढण्यात आली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us