धक्कादायक ! पसंतीचा उमेदवार पडल्याने टेन्शनमधून त्याने प्राशन केले गोचिड मारण्याचे औषध

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीत आपल्या पसंतीचा उमेदवार पडल्याने एका तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक माढा तालुक्यातील शिंदेवाडी येथे समोर आला आहे. विशेष म्हणजे त्याने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापुर्वी चिठ्ठी लिहीली असून त्यात पसंतीचे उमेदवार संजयमामा शिंदेंचा पराभव झाल्याने आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे.

पांडूरंग शिंदे (वय २४) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर बार्शीमध्ये उपचार सुरु आहेत.

पांडूरंग शिंदे हा आई, वडील, पत्नी आणि मुलासोबत माढा तालुक्यातील शिंदेवाडी येथे राहतो. तो म्हैसगाव येथील विठ्ठल कॉर्पोरेशन सुतगिरणीत लिपीक म्हणून काम करतो. माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजयकाका शिंदे यांचा पराभव कर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विजय मिळविला. त्यामुळे त्याला आलेल्या नैराश्यातून त्याने मेडीकल स्टोअरमधून गोचीड मारण्याचं औषध आणलं. त्यानंतर ते प्राशन केले. तो जागेवरच बेशुध्द पडला. त्यानंतर त्याचा चुलतभाऊ गजेंद्र शंकर शिंदे याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखळ केले. त्यामुळे तो थोडक्यात बचाला आहे.