कंटेनर चाळीस  फुटावरून खाली कोसळला 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन 

चालकाचे नियंत्रण सुटल्याने ४० फुट उंचीवरून कंटेनर खाली पडला. हा अपघात मुंबई-बंगळुरू महामार्गावर रावेत येथील पुलावर आज सकाळी सव्वा आठच्या सुमारास घटला आहे. देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पूलावरील बघ्यांची गर्दी होत आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’88974d4e-be23-11e8-a7dd-850d80752839′]

पुण्याकडून मुंबईच्या दिशेने कंटेनर निघाला होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने पवना नदीवरील समांतर पुलाच्या मधोमध असलेल्या मोकळ्या जागेतून खाली पडला. कंटेनरसोबत चालक रमेश विठ्ठल बुधावंत खाली पडला. मात्र नदीपात्रातील पाण्यामुळे किरकोळ जखमी झाला. त्याच्यावर देहूरोड येथे खाजगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. कंटेनर बाहेर काढण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत.

व्हाईटनरच्या नशेत गुरफटलीत शेकडो मुले

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like