भारतात ‘या’ महिन्यात नष्ट होईल ‘कोरोना’ महामारी, आरोग्य मंत्रालयातील जाणकारांचा दावा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतात कोविड-19 महामारी सप्टेंबरच्या मध्यंतराच्या जवळपास नष्ट होऊ शकते. आरोग्य मंत्रालयाच्या दोन जनअरोग्य तज्ज्ञांनी हा दावा केला आहे, ज्यांनी हा निष्कर्ष काढण्यासाठी गणिती प्रारूपावर आधारित विश्लेषणाचा आधार घेतला. विश्लेषणातून हे दिसते की, जेव्हा गुणांक 100 टक्क्यांवर पोहचेल तेव्हा ही महामारी नष्ट होईल. हे विश्लेषण ऑनलाईन जर्नल एपीडेमीयोलॉजी इंटरनॅशनलमध्ये प्रकाशित झाले आहे.

अभ्यासात आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाचे (डीजएसएच) उप संचालक (जन आरोग्य) डॉ. अनिल कुमार आणि डीजीएचएसच्या उप सहायक संचालक (कुष्ठ रोग) रूपाली रॉय सहभागी झाले होते. त्यांनी या निष्कर्षावर पोहचण्यासाठी बेलीच्या गणितीय प्रारूपाचा वापर केला. हे गणितीय प्रारूप एखाद्या महामारीच्या पूर्ण आकाराच्या वितरणावर विचार करते, ज्यामध्ये संसर्ग आणि त्यातून बाहेर पडणे, दोन्ही आहे.

हे प्रारूप निरंतर संक्रमण प्रकाराच्या रूपात वापरण्यात आले, ज्यातून संक्रमित व्यक्ती, संसर्गाचे स्रोत तेव्हा पर्यंत काय राहतील, जोपर्यंत या चक्रातून ते संक्रमण मुक्त होणार नाहीत किंवा त्यांचा मृत्यू होणार नाही. सोबतच एकुण संक्रमण दर आणि रोगातून बरे होण्याचा दराच्या दरम्यान संबंधाचे परिणाम मिळवण्याचे सुद्धा विश्लेषण करण्यात आले.

कागदपत्रांनुसार भारतात प्रत्यक्ष महामारी दोन मार्चपासून सुरू झाली होती आणि तेव्हापासून कोविड-19 ची पॉझिटिव्ह प्रकरणे वाढत गेली. विश्लेषणासाठी तज्ज्ञांनी भारतात कोविड-19 चे आकडे, एक मार्च ते 19 मार्चपर्यंत नोंदली गेलेली प्रकरणे, संसर्ग मुक्त झालेली प्रकरणे आणि मृत्यूशी संबंधीत आकडे घेतले होते.

अभ्यासाच्या कागदपत्रांनुसार बेलीज रिलेटिव्ह रिमूव्हल रेट (बीएमआरआरआर), कोविड-19 चे सांख्यिकी विश्लेषणातून (लिनियर) स्पष्ट झाले आहे की, सप्टेंबरच्या मध्यंतराच्या जवळपास लीनियर लाइन 100 वर पोहचत आहे.