कार्तिक आर्यन म्हणाला : ना सारा, ना अनन्या, पण हे माझे प्रेम आहे…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणार कार्तिक आर्यनने मोठा खुलासा केला आहे. कार्तिकच नाव नेहमी सारा अली खान आणि अनन्या पांडे सोबत जोडलं जात. परंतु या वेळेस कार्तिकने उत्तर दिले. अशातच मुंबई मध्ये आयोजित एका इव्हेंट मध्ये कार्तिकची तब्बेत खराब झाली आणि त्यावेळी तो पत्रकारांच्या प्रश्नामध्ये चांगलाच फसला गेला.

बॉलीवूड अहवालानुसार, कार्तिकला प्रश्न विचारला गेला की तुझं नाव पहिले सारा सोबत जोडलं आणि नंतर अनन्या पांडे सोबत जोडलं हा मुद्दा कुठ पर्यंत गेला आहे, आतापर्यंत तू कोणाला ही होय असे म्हटले नाही, परंतु तुझ्या प्रेमाची बातमी प्रत्येक दिवसात वृत्तपत्रात आहे. अखेरीस, हे प्रकरण कोठे पोहोचले आहे, काय होत आहे?

एवढा मोठा प्रश्न विचारल्यानंतर कार्तिकच्या चेहऱ्यावर टेन्शन आले. तो त्या प्रश्नाला टाळू सुद्धा शकत नव्हता. त्याने त्यावेळी असे उत्तर दिले की सगळे जण ते ऐकून थक- बक झाले. त्या प्रश्नावर त्याने उत्तर दिले की, ‘हाआआ… हो बरोबर, बातमी तर बरोबर आहे….. अअअ… आई एम मम्माज बॉय…’ कार्तिकचे उत्तर पूर्ण नव्हते. त्याला पुन्हा प्रश्न विचारला गेला की केंव्हा पर्यंत तू मम्माज बॉय राहणार आहेस, केंव्हा निवडणार तू आपली साथीदार? त्यावर तो म्हणाला की तो मम्माज बॉय आहे आणि हसू लागला.