साप चावल्याने ‘मृत’ घोषीत केलेल्या मुलीला वडिलांनी आणले मृत्यूच्या दाढेतून परत !

पिंपरी चिंचवड : पोलिसनामा ऑनलाईन – साप चावल्यानंतर आपल्या मुलीच्या उपचारासाठी धडपडणाऱ्या बापाची कहाणी काल तळेगाव दाभाडेमधील एका गावात पाहायला मिळाली. मनोज तींडोरे यांच्या मुलीला सापाने दंश केल्याने उपचारासाठी धडपणाऱ्या या बापाची करून कहाणी काल सर्वांना पाहायला मिळाली. मनोज तींडोरे यांच्या मुलीला मण्यार जातीच्या विषारी सापाने दंश केला. त्यामुळे ती बेशुद्ध पडल्यानंतर तिला दवाखान्यात नेण्यात आले.

मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मात्र तरीदेखील त्या बापाने जिद्द न हारता आपल्या मुलीवर उपचार करण्यासाठी जीवाचे रान केले आणि अखेर आपल्या मुलीचे प्राण वाचवले. तळेगाव जवळील कान्हे या खेडे गावात राहत असल्याने उचारासाठी त्यांना अनंत अडचणी आल्या. ख़ुशी नावाच्या या आपल्या लाडक्या लेकीला वाचवण्यासाठी त्यांनी दाखवलेली जिद्द खरेच प्रेरणादायक होती.

शासकीय रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांमुळे त्यांना आपल्या मुलीच्या उपचारासाठी प्रचंड अडचणी आल्या. मात्र त्यांनी अखेर जिद्द सोडली नाही. खुशीला मण्यार जातीच्या सापाने दंश केला होता. हा साप प्रचंड विषारी असून दंश केल्यानंतर काही वेळातच व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. मात्र या मुलीच्या वडिलांची जिद्द आणि मुलीची जगण्याची इच्छाशक्तीमुळे ती मृत्यूच्या दाढेतून पुन्हा बाहेर आली.

दरम्यान, या मुलीच्या वडिलांनी अनेक प्रयत्न केल्यानंतर त्यांना अखेर पिंपरीतील भूषण जगताप-देशमुख या सामाजिक कार्यकर्त्याने मदत केली. त्यामुळे या मुलीवर वेळेत उपचार शक्य झाले. या मुलीला पिंपरी चिंचवडच्या ‘स्पर्श हॉस्पिटलमध्ये’ भरती केलं गेले. अखेर दोन दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर ती शुद्धीवर आली आणि वडिलांच्या जिद्दीचा अखेर विजय झाला.

आरोग्यविषयक वृत्त –