दर्जेदार चॉकलेट्साठी पुण्यात कौन्सिलची स्थापना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

चॉकलेट म्हणजे लहानांसाठीच काय तर मोठ्यासाठी देखील जिव्हाळ्याचा विषय असतो. भेटवस्तू म्हणून चॉकलेट केक असो वा प्रेमाचे प्रतिक म्हणून चॉकलेट बुके असो, वर्षभर चॉकलेटची चलती असते. चॉकलेट भारतात १७ व्या शतकात आलं त्याचा मोठा उद्योग भारतात उभा आहे. मात्र खऱ्या चॉकलेटची चव आपल्या जिभेवर आजतागायत पोहचली नाही, असं म्हटलं तर आश्चर्य वाटायला नको. अनेकदा दात किडतील अशा भितीने आपण चॉकलेट खाण टाळतो, मात्र चॉकलेट अनेक देशात औषध म्हणून देखील वापरले जाते.

[amazon_link asins=’B00BYQEIL6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7f9a3de9-93ad-11e8-8f45-4386178d2096′]

भारतीय बाजारात ते कँडी स्वरूपात विकले जाते. त्यात खऱ्या चॉकलेटची मात्रा 12 ते 15 टक्के असते. अशा अनेक गुणांनी संपन्न असलेल्या चॉकलेट वर संशोधन आणि प्रसार, प्रचार करण्याच्या उद्देशाने पुण्यात प्रथमच ‘इंटरनॅशनल चॉकलेट रिसर्च अँड इनोव्हेशन कौन्सिल’ ची स्थापना करण्यात आली आहे. पुण्यातील महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंगच्या सभागृहात  29 जुलै सायंकाळी ५ वाजता या कोन्सिल उदघाटन करण्यात आले. यावेळी या कौन्सिलचे अध्यक्ष सानी अवसरमल, कॅडबरी इंडिया कंपनीचे माजी तंत्र प्रमुख सोली केकोबाद, बिंद्रा हॉस्पिटॅलिटीचे प्रमुख गुरविंदर बिंद्रा, झेलॉस चॉकलेट कंपनीचे तुकाराम भांगर, अभिरु बिश्वास, भारतीय फूड ट्रक असोसिएशन चे उपाध्यक्ष कुरेश बहारेनवला आणि इंटरनॅशनल चॉकलेट टेस्टर मंदार भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. या कौन्सिल कडून भारतातील चॉकलेटच्या विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

याबाबत माहिती देताना कोन्सिल चे अध्यक्ष सानी अवसरमल म्हणाले, पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत एकविसाव्या शतकात भारत चॉकलेट उद्योगात  आजही मागे आहे. दर्जेदार चॉकलेटसाठी भारतात प्रथमच प्रयत्न केले जात आहेत. कौन्सिलच्या माध्यमातून चॉकलेट उत्पादक कंपन्या, विपणन विभाग आणि कच्चा माल खरेदीदार आणि आयात निर्यात घटक आणि शासकीय संस्था ह्या एका छताखाली एकत्र येऊन चॉकलेट चे शुद्ध स्वरूप भारतीय ग्राहकांना  देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. इंटरनॅशनल चॉकलेट टेस्टर मंदार भोसले यांनी यावेळी सांगितले,  सध्या भारतात जे चॉकलेट मिळते त्यात काही प्रमाणातच खरेपणा आणि शुद्धता आहे. भारतीय ग्राहकांना शुद्ध व दर्जेदार चॉकलेटची चव चाखायला देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शुद्ध स्वरूपातील चॉकलेट कसे असते,ते कसे ओळखावे आणि त्याचे आरोग्यवर्धक फायदे कसे आहेत, याची जनजागृती करणार असल्याचे मंदार भोसले यांनी सांगितले. या कार्यक्रमात फूड इंडस्ट्री एक्सपर्ट ,शेफ ,होम बेकरी एस्पर्ट,  हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इन्स्टिट्यूटच्या आवारात उपस्थितांच्या माहितीसाठी विविध चॉकलेटसचे नमुने सादर करण्यात आले होते. अनेकांनी या शुद्ध स्वरूपातील चॉकलेटचा आनंद लुटला.