नोकर भरती घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी माजी नगराध्यक्ष काॅंग्रेसच्या मोर्चात

भोकर : पोलीसनामा आॅनलाईन

माधव मेकेवाड 

दि २५ सप्टेंबर २०१८ रोजी काँग्रेस कडून अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राफेल घोटाळा प्रकरणी नांदेड येथे मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात नोकर भरती घोटाळा प्रकरणातील फरार मुख्य आरोपी काॅंग्रेस पक्षाचा माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर आला होता. फरार आरोपीने खुलेआम येऊन मोर्च्यात हिरिरीने सहभाग घेतला. तरीही पोलीसांनी मात्र झोपेचे सोंग घेतले असल्याचे दिसून आले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6d10b131-c18d-11e8-907f-6d5fd0edcd07′]

सविस्तर माहिती अशी की, भोकर नगर परिषदेत २०१५ च्या कार्यकाळात बोगस नोकर भरती करण्यासाठी तत्कालीन  मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर, नगराध्यक्ष, आणि कर्मचाऱ्यांनी संगनमताने डाव रचून लक्षावधी रूपयांचा आर्थिक फायदा करुन घेतला. हा भ्रष्टाचारी कारभार चव्हाट्यावर आणत शाहिद प्रफुल्ल नगर  प्रभाग क्र. १३ च्या नगरसेविका अरूणा विनायक देशमुख यांना अनेकदा गुन्हेगार अधिकाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना जेरबंद करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडे पायपीट करावी लागली. मात्र, सर्व काही निष्फळ झाल्याने शेवटी मा.न्यायालयांतून गुन्हा नोंदवावा लागला.

सांगलीतील वाळवा तालुक्यात ७ मुलींचे लैंगिक शोषण 

गुन्हा नोंदविल्याच्या दिनांकापासुन मा. न्यायालयाची अवमानना करीत आजपर्यंत  केवळ पोलिस प्रशासनाच्या कृपादृष्टीने मोकाट फिरनाऱ्या गुन्हेगारांना अटक तर नाहीच, त्यांच्या चौकशीचाही कुठेच थांगपत्ता नाही. त्यामुळे पुन्हा एकदा नगरसेविका सौ.देशमुख यांना स्थानिक पोलिस प्रशासनाला गुन्हेगार असलेल्या अधिकाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांच्या चौकशी आणि अटकेसाठी साकडे घालावे लागत आहे.

अशा भ्रष्टाचारी गुन्हेगारी प्रवृतीच्या आरोपीला पोलीस मोकाट सोडत असतील तर सामान्य जनतेचं काय?

असा सामान्य जनतेमध्ये प्रश्न निर्माण होत आहे.