पुणे पोलीस आयुक्तालयातील जनरेटरला आग : पाेलिसांची धावपळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे शहर पोलीस आयुक्तालयात आज (शनिवार) दुपारी साडेतीनच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. आयुक्त कार्य़ालयातील एका जनरेटरला अचानक आग लागली. या घटनेमुळे आयुक्तालयातील पोलिसांची धावपळ झाली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cb9fe3df-c3cf-11e8-ae05-9ba90bde06f4′]

आयुक्तालयातील एका जनरेलटने अचानक पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी रवाना करण्यात आली आहे. ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, आगीमुळे आयुक्तालयात आलेल्या नागरिकांची आणि पोलिसांची धावाधाव झाली.
[amazon_link asins=’B072SWSQ1F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d01e196b-c3cf-11e8-8df4-65ded5d4ea64′]

अग्निशमन दलाच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी साडेतीनच्या सुमारास पुणे पोलीस आयुक्तालयातील एका जनरेटरला आग लागल्याची वर्दी मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाच्या मुख्यालयातील एक गाडी आणि जवान यांना घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. ही आग कशामुळे लागली तसेच किती नुकसान झाले हे अद्याप सांगता येऊ शकत नाही.