राहुरीत पत्रकाराला मारहाण

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – शूटिंग केल्याच्या संशयावरून राहुरीतील पत्रकाराला बेदम मारहाण करण्यात आली आहे. आज सायंकाळी ही घटना घडली.

भाऊसाहेब येवले हे मारहाण झालेल्या पत्रकाराचे नाव आहे. ते लोकमतचे राहुरी तालुका प्रतिनिधी आहेत. या घटनेनंतर पत्रकारांचा मोठा जमाव राहुरी पोलिस ठाण्यात जमा झाला आहे. गुन्हा दाखल करून मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे.

याबाबत माहिती अशी की, राहुरी शहरातील एका चौकात काही टपोरी लुटालूट करीत होते. नेमके काय सुरू आहे, हे पाहण्यासाठी येवले तिथे गेले. त्यांनी शूटिंग केली, या संशयावरून टोळक्याने येवले यांना मारहाण झाली. पत्रकार येवले यांच्यासह राहुरीतील पत्रकार पोलीस स्टेशनमध्ये निषेध नोंदवण्यासाठी जमा झाले आहेत .

Loading...
You might also like