लासलगाव-वेळापूर रस्त्याची झाली चाळणं

 लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – पाटोदा रोडवरील लासलगाव ते वेळापूर हा रोड निफाड़ तालुका हद्दित येत असून लासलगांव ते वेळापुर रोडची अवस्था अत्यंत खराब झालेली असून त्या रोडवर मोठे मोठे खड्डे पडलेले आहे. या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाकगाकडून दुर्लक्ष केले जात असून या रस्त्यांवर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहन धारकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहे. या भागातून मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतमाल विक्रीसाठी लासलगाव मध्ये येत असतात मात्र या जीवघेण्या खड्यामुळे वाहने चालविणे जिकरीचे झाले आहे. खड्ड्यांमुळे अपघात या ठिकाणी होत असून मार्केट मुळे या रोडवर रहदारी असल्याने त्याचे काम लवकरच मार्गी लागावे अशी मागणी रमेश पालवे व विशाल पालवे यांनी केली आहे.

लासलगाव-वेळापुर या रस्त्यांची अनेक वर्षापासून दुरावस्था झालेली आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहे. गेल्या कित्येक वर्षापासून साईड पट्ट्या देखील भरल्या गेल्या नाही. नागरिकांच्या वाहनाचे अपघात होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या रस्त्यांवर ऐन वर्दळीच्या ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यामधून वाहन उसळून अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागा ने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. या रस्त्याना कोणी वाली आहे की नाही, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिक आता विचारू लागले आहेत. या रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून वाहनचालकांना जबर दुखापतही होत आहे. वाहनांचा तर खड्ड्यांमुळे खुळखुळा होतच आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्पेशल दुर्लक्षमुळे रस्त्याची वाट लगलेली आहे. नेहमी वर्दळ असलेल्या या रोडची दुरावस्था झाल्याने या रोड चे काम तात्काळ मार्गी लावा अशी मागणी आता परिसरातील नागरिक करीत आहे.

प्रतिक्रिया – विशाल पालवे, वेळापूर
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाने या रस्त्याची वाट लागलेली आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. या मार्गावरुन सदा सर्वदा वर्दळ सुरू असते. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या खड्ड्यातून भरधाव गेलेल्या वाहनांना अपघात होणे हे प्रकार आता नित्याचेच झाले आहे. बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डेकडे लक्ष देऊन लवकरात लवकर रस्त्याचे काम करावे.