मराठा आंदोलन पेटले, पोलीस व्हॅनसह ६ बस जाळल्या

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी एक पोलीस व्हॅनसह ४ खाजगी गाड्या, ५ बस जाळून मोर्चाला हिंसक वळण दिले आहे.
[amazon_link asins=’B07B4THQHM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a85396ea-8e78-11e8-8e61-63cc72856de8′]
या बाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रभर चालू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाचे चक्का जाम आंदोलन दिवसेंदिवस पेटत जात आहे, महाराष्ट्रात विविध शहरात मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी बसेस ची तोडफोड केली आहे. याच पेटत असलेल्या मोर्च्याचे पडसाद आज (२३ जुलै ) गांखाखेड मध्ये पाहायला मिळाले. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी एका पोलीस व्हॅनसह चार गाड्या, पाच बस, पेटवून दिल्या. यामुळे गंगाखेड परिसरामध्ये दंगलीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे गंगाखेड परिसर  तात्काळ बंद करण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B0781VSTC1′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b123e807-8e78-11e8-90d3-b71269ce7aac’]
दरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी पेटवलेल्या वाहनांना विझवण्यासाठीअग्निशामक दलांनी  तात्काळ धाव घेतली आणि आग विझवली. यामध्ये 2 वार्ताहारही जखमी झाले आहेत. तर सुरक्षेच्या दृष्टीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आंदोलनात जखमी झालेल्यांना जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर ठिकठिकाणी मराठा मोर्चाच्या आंदोलकांनी वेगवेगळ्या स्वरूपात आंदोलन केले आहे.

जाहिरात