पिंपरी चिंचवडच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री घेणार बैठक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरी चिंचवड शहरातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र बैठक बोलवली आहे. ही बैठक गुरूवार नागपूर किंवा पिंपरी-चिंचवड येथे होणार आहे मात्र अद्याप नक्की झाले नाही. या बैठकीला चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या सोबत चर्चा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’150a0e8c-8911-11e8-83d9-1700bc14a55c’]

पिंपरी चिंचवड शहरातील अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित राहिले आहेत. शहराचा विकास झाल्याचे दिसत असले तरी अनेक मोठे प्रश्न आहे तसेच आहेत. विशेषतः शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. शास्तीकराचा निर्णय झालायं, मात्र अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. याशिवाय प्राधिकरणातील साडेबारा टक्के जमीन परतावा, रिंगरोड प्रश्न, पवना बंद पाईप लाईन, शहर विकास आराखड्यातील फेरबदलाचे प्रस्ताव, प्राधिकरणाच्या विलीनीकरणाचा प्रश्न, नदी सुधार प्रकल्पाला मंजुरी असे अनेक प्रश्न राज्य सरकारच्या दरबारी प्रलंबित आहेत.

हे प्रमुख प्रश्न प्रलंबित राहिल्यामुळेच राष्ट्रवादीला महापालिकेतून सत्तेतून पायउतार व्हावे लागले. एकेकाळचे अजित पवार यांचे खंदे समर्थक लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपचा रस्ता धरला. आमदार जगताप आज भाजपचे शहराध्यक्ष आहेत. तर महेश लांडगे हे संलग्न आमदार आहेत.
[amazon_link asins=’B0746HF973′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1bb16509-8911-11e8-a986-a9f4c397a43a’]

गेल्या ४ वर्षापासून हे दोन्ही आमदार शहराच्या प्रलंबित प्रश्नासाठी पाठपुरावा करत आहेत. मात्र शास्तीकर पूर्वलक्षीप्रमाणे माफ करण्याच्या निर्णया व्यतिरिक्त शहरवासियांच्या पदरी विशेष काही आलं नाही. आगामी विधानसभा निवणुकीला काही महिनेच शिल्लक राहिलेत. त्यामुळे मुख्यमंत्री याबैठकीत काही महत्वाचे निर्णय घेतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही बैठक २३ जुलै रोजी पिंपरी-चिंचवड शहरात होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र हे शक्य न झाल्यास नागपूर येथे बैठक होणार आहे.