५०० रुपये मागितल्याने भंगार विक्रेत्याची हत्या

डोंबिवली : पोलीसनामा आॅनलाइन – पाचशे रुपये मागितल्यामुळे झालेल्या वादातून भंगारविक्रेता दीपक चौहान (वय १९, रा. सोनारपाडा)  याची हत्या त्याच्याच मित्राने केल्याचे निष्पन्न झाले आहे. मानपाडा पोलिसांनी त्यांच्या मित्राला अटक केली आहे.
बादशहा खान असे अटक केलेल्या मित्राचे नाव आहे.

दीपक चौहान हा भंगार वेचून उपजीविका करत होता. तो शनिवारी दुपारपासून बेपत्ता झाला होता. त्याची पोलिसांकडेही तक्रार करण्यात आली होती. नकणीपाडा येथील एका हातगाडीवर पोलिसांना एक मृतदेह रविवारी सकाळी आढळून आला. तो दीपकचा असल्याचे निष्पन्न झाले. शस्त्राने वार करुन त्याची हत्या केली होती. त्याचा मृतदेह एका प्लास्टीकच्या गोणीत भरून भंगार जमा करण्याच्या गाडीवर ठेवण्यात आला होता.

भाजपकडून व्यंगचित्राद्वारेच राज ठाकरेंवर निशाणा 

याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात त्याच्या भावाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. दीपकचा मृतदेह आढळून आला त्या परिसरातील सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले असता त्यात हत्या करणारा बादशहाची छायाचित्रे कैद झाली होती. हत्या केल्यानंतर बादशहा हातगाडीवर काहीतरी वस्तू ठेवून जात असल्याचे दिसत होते. यावरुन पोलिसांनी बादशहाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान बादशहाने दीपकची हत्या केल्याची कबुली दिली. दीपकने बादशाहकडे पाचशे रुपये मागितले होते. मात्र, त्यास दीपकने नकार दिला असता दोघांमध्ये वाद झाला होता. त्यातून त्याने दीपकची हत्या केली. पोलिसांनी बादशहाला अटक केली आहे.