कल्पना चावलाच्या नावावरून ठेवण्यात आलं ‘स्पेसक्राफ्ट’चं नाव, ‘नासा’नं दिली माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एरोस्पेस कंपनी नॉर्थ्रॉप ग्रुमन कॉर्पोरेशनने आपल्या लॉन्चिंग सिग्नस अंतराळ यानाचे नाव भारतीय वंशाची अंतराळवीर कल्पना चावलाच्या नावावरुन ठेवले आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात हे अंतराळ यान सोडण्यात येणार आहे. नासाने फेसबुक पेजच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. कल्पना चावला ही भारतीय वंशाची अंतराळात जाणारी पहिली महिला होती. 2013 मध्ये अंतराळयानात झालेल्या दुर्घटनेत तिचा 6 सहकाऱ्यांसह दुर्दैवी मृत्यू झाला.

करनाल मध्ये झाला जन्म

कल्पना चावलाचा जन्म 1 मार्च 1962 रोजी हरियाणामधील करनाल येथे झाला. चार भावंडांपैकी ती सर्वात धाकटी होती. बालपणात कल्पनाला ‘माँटू’ म्हणून संबोधले जात असे. तिचे सुरुवातीचे शिक्षण करनालच्या टागोर बाल निकेतन येथे झाले. तिला आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी नासाला जाणे आवश्यक होते. याच उद्देशाने ती 1982 मध्ये अमेरिकेत गेली. टेक्सास विद्यापीठातून एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये एमटेक केले. त्यानंतर कोलोरॅडो विद्यापीठातून डॉक्टरेट मिळविली.

कल्पना चावला 1988 मध्ये नासामध्ये रुजू झाली. नासाच्या संशोधन केंद्रात तिची नेमणूक झाली. त्यानंतर ती मार्च 1995 मध्ये नासाच्या अंतराळवीर कॉर्पोरेशनमध्ये रुजू झाली. सुमारे आठ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर तिने 19 नोव्हेंबर 1997 रोजी प्रथम अंतराळ मोहिमेस सुरुवात केली. या प्रवासाला जाताना तिला भारतासह संपूर्ण जगाने जयघोष करून शुभेच्छा दिल्या होत्या.

प्रथम अंतराळ मोहिमेची सुरुवात 19 नोव्हेंबर 1997 रोजी झाली

कल्पना चावलाने 19 नोव्हेंबर 1997 रोजी पहिल्या अंतराळ मोहिमेची सुरुवात केली. तेव्हा तिचं वय 35 वर्षे होतं. 6 अंतराळवीरांसह तिने कोलंबिया एसटीएस -87 अंतराळ शटल उडविले. कल्पनाने तिच्या पहिल्या मोहिमेदरम्यान सुमारे 372 तास अंतराळात 1.04 दशलक्ष मैलांचा प्रवास केला.

कल्पना चावला अंतराळात पोहोचणारी पहिली भारतीय महिला आणि पहिली अंतराळयात्रि ठरली. परत येताना पृथ्वीच्या वातावरणात अंतराळ यानात प्रवेश होताना एक भयंकर अपघात झाला. 1 फेब्रुवारी 2003 रोजी कोलंबिया अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करताच विस्कळीत झाले. क्षणार्धात अंतराळ यानाचे अवशेष आणि त्यातील सात प्रवासी टेक्सास नावाच्या शहरात पडले आणि यशस्वी नावाची मोहीम शोकांतिका बनली. नासा आणि संपूर्ण जगासाठी ही अत्यंत दुःखद घटना होती.