धक्कादायक…भाडेकरू मुलाकडून मालकाच्या मुलीवर अत्याचार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

मालकाच्या घरात अल्पवयीन सोळा वर्षाची मुलगी एकटीच असल्याचा गैरफायदा घेत भाडेकरू मुलाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हा धक्कादायक प्रकार बुधवारी (of.18) दुपारी शहरात घडला आहे.

[amazon_link asins=’B07BHG5446′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b055e627-8c28-11e8-8ad1-25367483236f’]

रियजुद्दीन इद्रिस अन्सारी (२२, रा. उत्तरप्रदेश) याला अटक केली आहे. तर पीडित मुलीच्या आईने तक्रार केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितमुलगी बुधवारी दुपारी घरात एकटी होती. त्यावेळी रियजुद्दीन हा तिच्या घरात आला. आतून दरवाजाला कडी लावली. तोंड दाबून तिच्यासोबत लैंगिकअत्याचार केले.तसेच याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. शेवटी पीडित मुलीने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला आणि त्यानंतरपोलिसांकडे तक्रार दिली. तपास वाकड पोलीस करत आहेत.