प्रसिद्ध चित्रपट निर्माता, दिग्दर्शकाच्या मुलीचा सासरच्यांकडून छळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चित्रपटात काम मिळावे म्हणून प्रसिद्ध निर्मात्याच्या विवाहित मुलीचा छळ तिच्या पतीकडून केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच तिचा मानसिक व शारीरिक छळ करून ५६ लाखांच्या दागिन्यांचा अपहार केला. याप्रकरणी ओशीवरा पोलीस ठाण्यात पती, सासू व सासरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

वसीम नसीम शेख, सासरा नसीम अहमद शेख आसनी सासू गुलणार अशी त्यांची नावे आहेत.

तक्रारदार विवाहितेचे वडील चित्रपट निर्माता व दिग्दर्शक आहेत. त्यांनी निर्माण केलेले अनेक चित्रपट गाजलेले आहेत. पिडीतेची चुलती रहात असलेल्या परिसरातच पती मोहम्मद वसीम नसीम शेख, सासरा नसीम अहमद शेख आसनी सासू गुलणार हे राहतात. त्यामुळे त्यांचे तिच्याकडे येणे जाणे असायचे. वसीन हा चित्रपटांमध्ये स्टंटमॅन म्हणून काम करत होता. यातूनच त्याची ओळख तिचा विवाह वसीम सोबत आठ वर्षांपुर्वी करण्यात आला.

त्याला चित्रपटात अभिनेता बनायचे होते. तर त्याचे वडील नसीम शेख यांना फाईट मास्टरची संधी हवी होती. विवाहितेच्या वडीलांनी ही संधी आपल्याला द्यावी असा तगादा पती आणि सासऱ्याने तिच्याकडे लावला. मात्र ती त्याला प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे पती, सासू आणि सासऱ्याने तिचा छळ सुरु केला. तिने याबाबत वडीलांनी काहीच सांगितले नाही. आणि पती सासऱ्याची शिफारसही केली नाही. याच रागातून पती वसीम आणि विवाहिता यांच्यात खटके उडू लागले. लग्नात दिलेले ४० लाखांचे दागिने, १२ लाखांचे कपडे, इतर वस्तू आणि ५२ हजाराची रोकड त्यांनी तिच्याकडून काढून घेतली. व माहेरहून नव्या व्यवसायासाठी पैसे आणण्याची धमकी देऊ लागले.

अखेर पिडीतेच्या वडीलांनी त्याला पाच लाख रुपये दिले. परंतु त्यांचे एवढ्यावर समाधान होत नव्हते. सासरा नशेच्या आहारी गेला होता. तो ड्रग्जच्या व्यवसायातही अडकला. त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला होता. त्याला सोडविण्यासाठी तिला माहेरहून आठ लाख रुपये आणण्यास भाग पाडण्यात आले होते. शेवटी त्रास असह्य झाल्यावर तिने छळाचा सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. तिला वडीलांनी माहेरी नेले. त्यांची बैठक झाली त्यात त्याने पत्नीला त्रास देणार नाही. अशी हमी दिली. परंतु त्याच्या आचरणात बदल न झाल्याने तिने माहेरी राहण्याचा निर्णय घेत पतीकडे असलेल्या ५६ लाखांच्या स्त्रीधनाची मागणी केली. ते परत त्याने परत दिले नाहीत. म्हणून ओशिवरा पोलीस ठाण्यात पती वसीम, सासू गुलनार आणि सासरा नसीम या तिघांविरोधात तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.