The Poona Gujarati Kelvani Mandal Pune | ‘दि पूना गुजराती केळवाणी मंडळा’च्या इंग्रजी माध्यम शाळा नवा उपक्रम राबविणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – The Poona Gujarati Kelvani Mandal Pune | पुणे येथील दि पूना गुजराती केळवणी मंडळाच्या (The Poona Gujarati Kelvani Mandal Pune) शेठ एच.आय. प्रि प्रायमरी (Sheth H.I. Pre-Primary) आणि शेठ आर.एन.शहा इंग्लिश मिडियम प्रायमरी स्कूल (Sheth R.N. Shah English Medium Primary School) येथे “लीड स्कूल” यांच्या अभ्यासक्रमाचा शुभारंभ येत्या शैक्षणिक वर्षापासून होत आहे. दि पूना गुजराती केळवाणी मंडळाच्या इंग्रजी माध्यम शाळा नवीन उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहेत. लीड स्कूलच्या अभ्यासक्रमामुळे येथे शिकणाऱ्या विद्यार्थींना नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षित करण्याचा निर्धार संस्थेच्या मॅनेजमेंट कमिटीने केला आहे.

या अभ्यासक्रमाशी निगडीत असलेली पुस्तके, स्मार्ट टीव्ही, टॅबलेट, स्टुडं ॲप, पालक ॲप या सारख्या डीजीटल उपकरणांनी सुसज्ज असा लीड स्कूल एक्सपिरियन्स हब (Lead School Experience Hub) स्थापित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे उपसंचालक जनकभाई शहा (Janakbhai Shah), सेक्रेटरी हेमंत भाई मणियार (Hemant Bhai Maniyar), सहसचिव प्रमोद भाई शहा (Pramod Bhai Shah) आणि पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होता. लीड स्कूलच्या पालकांनी मोठ्या प्रमाणात समर्थन केले व शाळेला पाठिंबा दिला. (The Poona Gujarati Kelvani Mandal Pune)

लीडचे डायरेक्टर निशांत देशपांडे (Nishant Deshpande) यांनी लीडची माहिती पालकांपर्यंत पोहचवली. ELGA (English Language and General Awareness) च्या माध्यमातुन विद्यार्थींच इंग्रजी भाषेवर प्रभुत्व वाढ, क्रमाने त्यांचा आत्मविश्वास वाढेल व इतर विषय समजण्यास मदत होईल असा विश्वास दोन्ही शाळांच्या मुख्याध्यापकांनी व्यक्त केला. याचबरोबर विद्यार्थी सामान्य ज्ञान, कम्प्युटर कोडींग सारखे विषय पण शिकतील. या सगळ्या उपक्रमांतून विद्यार्थींची शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबर शिक्षकांचे वेळोवेळी ट्रेनिगं व पालकांची सहविचार सभा घेऊन सर्वात्मक विकास घडविण्यासाठी शाळेनी संकल्प केला. ”गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या उपक्रमांसाठी पालकाकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही,” असे ट्रस्टी राजेश भाई शहा (Rajesh Bhai Shah) यांनी जाहीर केले.

Web Title : The Poona Gujarati Kelvani Mandal Pune | English medium school
of ‘The Poona Gujarati Kelvani Mandal’ will implement a new project

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त