आंदोलकांनी शिवाजीनगर, सिंहगड रोडवरील वाहतूक रोखली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

खंडूजी बाबा चौकात आंदोलन सुरू असून सुमारे दीड तासापासून आंदोलन कर्त्यांकडून रास्तारोको करण्यात आले आहे. आंदोलक रस्त्यावर बसून राहिले असून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B077PWK5QD’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’46d1d1c2-9be2-11e8-be89-6b700569dd4f’]

मराठा आरक्षणासाठी सूर्यादयापासून ते सूर्यास्तापर्यंत ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली होती. हा बंद शांतता, अहिंसेच्या मार्गाने करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केले होते. मात्र, समन्वयाकांच्या आव्हानाकडे दुर्लक्ष करुन सायंकाळी सहा नंतर देखील आंदोलन सुरु आहे. सायंकाळी सहा नंतर परिस्थीती पूर्ववत होईल अशी अपेक्षा नागरिकांना होती. परंतु आंदोलकांनी आपले आंदोलन सुरु ठेवले आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिल्यानंतर आंदोलकांनी जिल्हाधीकारी कार्यालयाची तोडफोड केली. त्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण झाले आहे. आंदोलक सायंकाळचे सात वाजले असतानाही जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर थांबले आहे. या आंदोलन कर्त्यांना पांगवण्यात पोलीस प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही.

दरम्यान, सायंकाळी आंदोलक डेक्कन येथील खंडोजी बाबा चौकात जमले आहेत. या आंदोलकांनी शिवाजीनगर, सिंहगड रोड कडे जाणारी वाहतूक रोखून धरली आहे. तर कात्रजमध्ये आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे. तसेच आंदोलकांनी सायंकाली सव्वापाचच्या सुमारास मार्केट यार्डमध्ये बसची तोडफोड केली.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4d406570-9be2-11e8-a9bb-ff69e5759bcf’]

पुणे शहर आणि जिल्ह्यात बंदच्या काळात चांदणी चौक, उर्से टोल नाका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी झालेले तोडफोडीचे प्रकार वगळता बंद शांततेत झाला – जिल्हाधिकारी नवल किशोर राम