सत्तारूढ पक्षनेत्याने केली प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या कामाची पाहणी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाचे नुतनीकरण झाल्यानंतर पिंपरी चिंचवडमधील रसिक, कलावंतासाठी हे प्रेक्षागृह पर्वणी ठरेल. त्यासाठी पेक्षागृहाचे दुरुस्तीची कामे झटपट पूर्ण करावीत, अशा सूचना महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
[amazon_link asins=’B0785JJF7L,B07B6SN496′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b8d2111a-af71-11e8-9a69-89ae5e437541′]

महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी आज रविवारी (दि.२) या कामाची पाहणी केली. या वेळी महापालिकेचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, सांस्कृतिक शहर म्हणून पिंपरी-चिंचवड शहराची ओळख आहे. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणात कार्यक्रमास येत असतात. मोठमोठे उत्सव, सेमिनार, सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी केले जातात. शहरातील नाट्यसंस्था, कलावंत व प्रेक्षकांसाठी सुसज्ज असे प्रेक्षागृह असणार आहे. या मध्ये प्रामुख्याने तुटलेल्या खुर्च्या, स्वच्छतागृहांची अंतर्गत दुरूस्ती, प्रवेशद्वारावरील भव्य कमान, पार्किंगची सुसज्ज व्यवस्था, तिकीट बुकिंग विंडो, सभागृह, बाल्कनी, स्टेज, बॅकस्टेज, ग्रीन रुम, व्हीआयपी रुम, साउंड सिस्टीम यामध्ये अत्याधुनिकता करण्यात येणारआहे. ही सर्व कामे या नुतनीकरणाच्या माध्यमातून होणार आहेत. त्यामुळे प्रेक्षागृहाची रचना आणखी आकर्षक होणार आहे.

शहरातील नाट्यसंस्था, कलावंत, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजक व कलारसिकांसाठी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहांचे काम लवकरच पूर्ण करून उपलब्ध करून देण्यात येईल असा विश्वास पक्षनेते पवार यांनी दिला. तसेच नुतनीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशा सूचनाही पक्षनेते पवार यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

जाहिरात