साताऱ्यातील पावसात झालेल्या सभेचं गुपित आलं समोर; वाचा सुप्रिया सुळे काय म्हणाल्या…

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन –   सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी या मतदारासंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भरपावसात भाषण केले होते. त्यांच्या या भाषणाची राज्यातच नाही तर संपूर्ण भारतात चर्चा झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवारच या निवडणुकीत विजयी झाला. पण आता याच सभेच गुपित समोर आले आहे.

साताऱ्यातील सभेबाबत बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, साताऱ्यातील पावसात झालेल्या सभेला साहेब कारणीभूत नाहीत तर व्यासपीठावरील एक माणूस कारणीभूत आहे आणि त्या माणसाचे नाव आहे शशिकांत शिंदे. सभेच्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता. शशिकांत शिंदे यांनी मला फोन केला. पण मी बाहेर प्रचारात होते. त्यावेळी त्यांनी मला सॉरी म्हटले. जेव्हा त्यांनी मला सॉरी म्हटले तेव्हा मला भीतीच वाटली. साताऱ्यात सभा झाली तेव्हा साहेब पावसामुळे भिजून गेल्याचे शिंदे यांनी सांगितले.

तसेच त्या म्हणाल्या, शरद पवार सध्या 80 वर्षांचे आहेत. त्यांच्या पायालाही जखम झाली आहे. त्यामुळे मला जर भीतीच वाटली. शिंदे यांनी सांगितले, की साहेब आणि मी कशाचीही पर्वा केली नाही आणि सभा घेण्याचा निर्णय घेतला. लढायचं आहे तर पूर्ण ताकदीने लढू असेही ते म्हणाले.

कॅमेरामनही नव्हता पण…

शरद पवार आणि शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात सभा घेतली आणि ती यशस्वी झाली. पण या सभेला एकही कॅमेरामन नव्हता. सभा रद्द झाल्याचे अनेकांना वाटलं. पण कॅमेरामनला बोलावण्यात आले. कॅमेरामनही दीड लाखाचा कॅमेरा घेऊन उभा होता.