दूकानाला आग लागली, काही मिनिटांतच होत्याचं नव्हतं झालं

नायगाव :  पोलीसनामा आॅनलाइन (माधव मेकेवाड) – शंकरनगर तालुका बिलोली येथे असलेल्या आरून टेलर दूकानास अचानक लागलेल्या आगेत दूकानातील शिवलेली कपडे व शिवायचे असलेल्या कपड्यासह शिलाई मशिन व दूकानातील इतर पावनेतीन लाखाचे साहित्य जळून खाक झाले आहे. घटना दि.३१ आँक्टोंबर रोजी सांयकाळी ८:४५ च्या सुमारास घडली असुन सदरील घटनेचा पंचनामा तलाठी एस.ऐ.शिंदे यांनी केले आहे.

शालेय विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करणारा आरोपी जेरबंद 

सविस्तर माहिती अशी, टाकळी (खू) तालुका बिलोली येथील रहिवाशी अरून मोहन लिंगनवार हे आपल्या कूटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी गेल्या अनेक वर्षापासुन शंकरनगर येथे टेलरीगंचे दूकान टाकून दूकानात कूटूंबातील सर्व व्यक्ती कपडे शिवण्याचा व्यवसाय करीत होते. ते नेहमी प्रमाणे दि ३१ आँक्टोबर रोजी सांयकाळी ७.३० वाजे पर्यंत कपडे शिवून दूकान बंद करून घरी गेले. ८.४५ वाजता अचानक दूकानालस आग लागल्याचे दिसुन आले. दूकानचे शेटर उघडून आग विझवे पर्यंत दूकानातील दिपावली सनाची शिवलेली ८० ड्रेस,१ लाख २४ हजार, शिवायची असलेली ५० ड्रेस ६० हजार, दूकानतील छोटे ४ शिलाई मशिन व एक मोठी शिलाई मशिन अशा पाच मशिन किमंत ७१ हजार यासह दूकानातील कूलर,फॅण,काँन्टर,यासह इतर साहित्य जळाले. सुमारे २ लाख ७८ हजाराचे साहित्य जळून खाक झाले आहे.

अरून लिंगनवार व त्यांचे कूटूंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन हे दूकान होते. पंरतू सदरील दूकान हे जळून खाक झाल्याने लिगंनवार कूटूंबियांवर दिपावली सनावरच उपासमारीची वेळ आली. असल्याने सबंधीत लोकप्रतिनिधि व प्रशासनाने तत्काळ  मदतकरावी अशी मागणी केल्या जात असुन अरून लिंगनवार यांनी घडलेल्या घटनेची माहिती रामतीर्थ सज्जाचे तलाठी एस.ऐ.शिंदे यांना दिली असता शिंदे यांनी दि.०१ नोहेबंर रोजी सकाळी ०९ च्या सुमारास घटना स्थळी भेट देऊन घडलेल्या घटनेचा रितसर पंचनामा केला आहे.